• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Spjimr Launches Pgpdm Batch 25

SPJIMRने PGPDM बॅच २५ केली लाँच; प्रोग्रॅमला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ट्रिपल क्राऊन’ मान्यता प्राप्त

भारतीय विद्या भवनच्या SPJIMRने त्यांच्या PGPDMच्या २५व्या बॅचचे उद्घाटन केले. हा कोर्स सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 'ट्रिपल क्राऊन' मान्यता प्राप्त आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 13, 2025 | 02:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय विद्या भवनच्‍या एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर)ने त्‍यांच्‍या पोस्‍ट ग्रॅज्‍युएट प्रोग्राम इन डेव्‍हलपमेंट मॅनेजमेंट (PGPDM) च्‍या २५ व्या बॅचचे (सिल्‍व्‍हर जुबली बॅच) उद्घाटन केले. या लाँचसह संस्थेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भारतातील हा एकमेव डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रोग्राम असून, त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर EQUIS, AACSB आणि AMBA-BGA यांच्याकडून प्रतिष्ठित ‘ट्रिपल क्राऊन’ मान्यता मिळाली आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा काम करण्याची इच्छा असलेल्या व्यावसायिकांसाठी हा कोर्स विकसित करण्यात आला असून, तो शैक्षणिक उत्कृष्टता आणि व्यावहारिक प्रशिक्षणाचे अनोखे मिश्रण प्रदान करतो.

वसईतील उत्कर्ष विद्यालयाने मारली बाजी! ‘या’ तालुकास्तरीय उपक्रमात प्रथम क्रमांकाने सन्मानित

उद्घाटन समारंभात पीजीपीडीएमचे अध्यक्ष प्रो. तनोजकुमार मेश्राम, AVPN च्या दक्षिण आशियामधील प्रादेशिक संचालक लावण्या जयराम, सिल्व्हर जुबली बॅचचे ४४ सहभागी, तसेच प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीप-प्रज्वलनाने झाली, जे ज्ञानप्राप्ती आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रतीक होते.

प्रो. मेश्राम विद्यार्थ्‍यांचे मार्गदर्शन करत म्‍हणाले, ”तुम्‍हा प्रत्‍येकाला भारतभरातील अनुभव व पैलूंची जाण आहे. ही विविधता तुमची ताकद आहे, ज्‍यामुळे अध्‍ययन वातावरण अधिक उत्‍साहपूर्ण होते आणि तुम्‍ही सामाजिक क्षेत्रातील गुंतागुंतीच्‍या आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी सक्षम होता. या संपन्‍न विविधतेसह परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती तुमची आवड या प्रोग्रामला अद्वितीय व प्रभावी बनवते.” पीजीपीडीएम बॅच २५ मध्‍ये ४० टक्‍के विद्यार्थीनी आणि ६० टक्‍के विद्यार्थ्‍यांचा सहभाग आहे, जेथे सहभागींचे सरासरी वय ३३ वर्ष असण्‍यासोबत कामाचा सरासरी नऊ वर्षांचा अनुभव आहे आणि ते भारतातील १६ राज्‍यांमधून आहेत. लावण्‍या जयराम सामाजिक गुंतवणूकीच्‍या महत्त्वाबाबत मत व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, ”आजच्‍या गुंतागुंतीच्‍या विश्‍वामध्‍ये सामाजिक गुंतवणूकीसाठी सहयोग अधिक महत्त्वाचे बनले आहेत. आपण भावी पिढ्यांसाठी आपले सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट गोल्‍स (एसडीजी) संपादित करण्‍यासाठी यंत्रणा स्‍तरावर, तसेच कोणत्‍या क्षेत्रात सहयोगाने काम करण्‍याची आवश्‍यकता आहे याबाबत विचार केला पाहिजे. मी तुम्‍हा सर्वांना सक्रियपणे सहयोग करण्‍याचे आवाहन करते, ज्‍यामुळे प्रभावामध्‍ये अधिक वाढ होऊ शकते.”

विवा महाविद्यालयात “एक्सप्रेशन स्पुकी व्हिजन”चा धमाका; जाहिरातींचा अनोखा उत्सव!

२०११ पासून पीजीपीडीएम प्रोग्रामने भारतातील २६ राज्यांमध्ये ३५० हून अधिक कंपन्यांमध्ये सामाजिक बदल घडवला आहे. या कोर्सचे माजी विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक, प्रमुख, संचालक, सामाजिक उद्योजक, CSR व्यवस्थापक, प्रोग्राम अधिकारी आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. हा १२ महिने चालणारा मॉड्युलर प्रोग्राम सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि धोरणात्मक दृष्टीकोन विकसित करण्यास मदत करतो. यात ६ संपर्क सत्रांमध्ये ३० अभ्यासक्रम शिकवले जातात. ऑन-कॅम्पस आणि ऑनलाइन शिकण्याच्या संकल्पनेवर आधारित हा कोर्स एसपीजेआयएमआरच्या मुंबई कॅम्पसमध्ये तीन संपर्क सत्रांसह राबवण्यात येतो.

Web Title: Spjimr launches pgpdm batch 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Educational News
  • SPJIMR

संबंधित बातम्या

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी
1

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
2

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा
3

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
4

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

‘टेस्ला आणलीत, रस्ते आणि शिस्त केव्हा आणाल?’ अभिनेता शशांक केतकरचा सरकारला प्रश्न

‘टेस्ला आणलीत, रस्ते आणि शिस्त केव्हा आणाल?’ अभिनेता शशांक केतकरचा सरकारला प्रश्न

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

२७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार? भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे ढकलली

२७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार? भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे ढकलली

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.