आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या जाहिरातींना केंद्रस्थानी ठेवत विवा महाविद्यालयातील बीएएमएमसी विभागातर्फे “एक्सप्रेशन” या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदा या स्पर्धेचे १९ वे वर्ष होते, आणि विशेष म्हणजे “स्पुकी व्हिजन” ही अनोखी थीम निवडण्यात आली होती. यामध्ये जाहिरात क्षेत्रातील हॉरर अपील वापरून विविध जाहिराती तयार करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर होते. भयाचा प्रभावी वापर, संवाद बांधणी, पात्र रचना आणि जाहिरातींचे विविध प्रकार यांचा अद्वितीय संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर आणि टीमवर्कच्या म्हणजेच एकतेच्या बळाने जाहिराती तयार केल्या.
विविध तर्ह्याच्या स्पर्धा या कार्यक्रमात आयोजित करण्यात आल्या होत्या. एकंदरीत, या कार्यक्रमात प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन कमर्शिअल, रेडिओ जिंगल्स आणि शार्क टँक यांसारख्या विविध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्ध्येमध्ये भाग घेतला. महत्वाची बाब अशी आहे की बीएएमएमसी विभागाचे गीत यावेळी प्रदर्शित करण्यात आले होते, ज्याचे लेखन माजी विद्यार्थी श्रेयस पाटील यांनी केले. या अनोख्या उपक्रमामुळे जाहिरात क्षेत्राच्या कलात्मक आणि व्यावसायिक बाजूंचा सखोल अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
कार्यक्रमाचे प्रमुख परीक्षक म्हणून क्रिएटिव्ह बिग आयडिया कम्युनिकेशनचे सहदेव मंगेश राऊळ यांनी उपस्थिती लावली. तसेच, सहा. प्राध्यापक तृप्ती पाटील आणि सहा. प्राध्यापक बाळकृष्ण अईर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमासाठी उमंग प्रॉपर्टीज, खोपरे बंधू, अरेना ऍनिमेशन आणि जय खंडोबा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रायोजकत्व दिले. विभागाच्या प्रमुख शाहीन महिडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या उपक्रमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
विद्यार्थ्यांनी विविध उत्पादन आणि ब्रँड्स यांचा प्रभावी वापर करून जाहिराती तयार केल्या, ज्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. महाविद्यालयातील विविध विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, ज्यामुळे या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्र ठाकूर, सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, व्यवस्थापन समिती सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये, तसेच विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य डॉ. वी. एस. अडिगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि डॉ. दिपा वर्मा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.