Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न

राज्यात उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होत असून ‘कॉपीमुक्त अभियान’ कडकपणे राबवले जाणार आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान परीक्षा होणार असून १६.१५ लाख विद्यार्थी सहभागी आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 19, 2026 | 04:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यात उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात होत असून, यंदा ‘कॉपीमुक्त अभियान’ अधिक कडकपणे राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही परीक्षा बुधवार, १८ मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाशिममध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरमध्ये सामूहिक कॉपी! तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे

यंदा राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. राज्यभरात २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत आहेत. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अनेक केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे परीक्षा प्रक्रिया कैमेराबद्ध केली जाणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, १९८२ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असून, हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Washim News : जिल्ह्यात कॉपीमुक्तीचा डोलाराच कोसळला… ४७ शिक्षक रडारवर; ६३२ कॉपी बहाद्दर पकडले

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० आणि दुपारी २.३० वाजता पेपर सुरू होणार आहेत. प्रवेशपत्र शाळांच्या लॉगिनमधून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. गतवर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर १० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार आवश्यक सवलती लागू राहतील. प्रशासनाने सर्व व्यवस्था पूर्ण केल्याचा दावा करत विद्यार्थ्यांना शांत आणि प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Ssc exam will be start from tommorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
1

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..
2

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
3

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.