Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखाे उमेदवारांचे टेन्शन वाढले? SSC GD कॉन्स्टेबल परीक्षेच्या तारखेत अचानक झाला बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक!

SSC GD Constable Exam Date 2026 Changed: एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना प्रवासाचे नियोजन का बदलावे लागणार आहे? बकरीदच्या सुट्टीमुळे कर्मचारी निवड आयोगाने (SSC) परीक्षेच्या तारखेत नेमका कोणता मोठा बदल केला आहे? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 25, 2026 | 10:45 AM
SSC GD

SSC GD

Follow Us
Follow Us:

SSC GD Constable Exam Date 2026 Changed: एसएससी जीडी (SSC GD) कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तयारी करत असणाऱ्या लाखो उमेद्वारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करत नवीन तारीख जाहीर केली आहे.

आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आधी ही परीक्षा २८ मे २०२६ रोजी आयोजित केली जाणार होती. मात्र, आता यामध्ये आयोगाने बदल करत ती २७ मे २०२६ ही निश्चित केली आहे. त्यामुळे उमेद्वारांना आता आपल्या तयारीसाठी आणि प्रवासाच्या नियोजनात आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत.

का बदलली SSC GD कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख?

एसएससी आयोगाने परीक्षेच्या तारखेत बदल करण्यापाठीमागे सरकारी सुट्टीचे कारण दिले आहे. २८ मे २०२६ रोजी ईद उल जुहा (बकरी ईद) ची सुट्टी असल्याने नियोजित भरतीच्या तारखेत बदल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे, पुर्वी निश्चित केलेल्या तारखेमुळे प्रशासकीय व्यवस्था आणि उमेद्वारांची गैरसोय टाळण्यासाठी आयोगाने ही परीक्षा २७ मे २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

CBSE बोर्डाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी मुदत का वाढवली? जाणून घ्या नवी तारीख!

परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) २ ते ३ दिवस आधी मिळणार

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र (एडमिट कार्ड) परीक्षेच्या साधारण २ ते ३ दिवस आधी जारी केले जाईल. उमेद्वारांना एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या लॉगिनवर सर्व आवश्यक तपशील भरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.

या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, रिपोर्टिंगची वेळ आणि इतर महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतील. ही भरती परीक्षा केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs), एसएसएफ (SSF) आणि आसाम रायफल्समधील रायफलमन (जीडी) यांसह विविध पदांसाठी आयोजित केली जात असते. या भरती प्रक्रियेत दरवर्षी देशभरातील लाखो तरुण या परीक्षेत सहभागी होतात.

NEET UG 2026 Paper Leak: पुण्याच्या मुख्याध्यापिकेने उघड केले ‘एनटीए’ कनेक्शन; आता रसायनशास्त्र तज्ञही सीबीआयच्या जाळ्यात?

Web Title: Ssc gd constable exam 2026 date changed new schedule admit card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Army Job
  • army Soldier
  • Government Job
  • SSC

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
2

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
3

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..
4

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.