Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात गोंधळ, विद्यार्थ्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2026 | 04:00 PM
पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात गोंधळ, विद्यार्थ्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा

पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात गोंधळ, विद्यार्थ्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा

Follow Us
Follow Us:
  • पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात गोंधळ
  • विद्यार्थ्यांमध्ये संताप
  • आंदोलनाचा दिला इशारा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या सात दिवसांपासून परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली असून, दररोज सुमारे २०० ते ३०० विद्यार्थी आपल्या तक्रारी घेऊन विद्यापीठात धाव घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या मते, अनेकांचे परीक्षा फॉर्म अद्याप भरले गेले नाहीत.

 

ऑनलाइन प्रणालीतील बिघाडामुळे फॉर्म सबमिट होत नाहीत, तर काही विद्यार्थ्यांचे शुल्क भरूनही अर्ज रिजेक्ट झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, अशा विद्यार्थ्यांना अद्याप फी परतावा (रिफंड) मिळालेला नाही. पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठात येत असून, महाविद्यालयांकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळत नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठाकडे पाठवले जात आहे.

दरम्यान, पुढील १५ दिवसांत परीक्षा सुरू होणार असताना अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म अद्याप अपूर्ण राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ABVP चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखा अध्यक्ष तनिष्क शेळके यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी परीक्षा विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून, पुढील दोन दिवसांत सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : दादा शब्दाचे पक्के तर कामाचे एक्के होते, दादांच्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतोय; बारामतीकरांना सुनेत्रा पवारांसमोर अश्रू अनावर

परीक्षा शुल्क माफीची घोषणा फक्त कागदावरच, विद्यार्थ्यांना परतावा नाहीच

राज्यात नैसर्गिक आपत्ती, महामारी किंवा इतर संकटांच्या काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून परीक्षा शुल्क माफीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. स्टूडंट हेल्पिंग हँडस संस्थापक अँड. कुलदिप आंबेकर यांनी सांगितले की, “विविध महाविद्यालय आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून पूर्ण परीक्षा शुल्क आधी वसूल केले जात असून, नंतर परतावा दिला जाईल असे सांगितले जाते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना हा परतावा मिळालेला नाही. महाविद्यालयाच्या नोटीसनुसार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शुल्क माफी लागू होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे परीक्षा शुल्क माफी योजना केवळ घोषणांपुरती मर्यादित राहत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांवर याचा अधिक परिणाम होत असल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Students have expressed anger over ongoing technical difficulties in the pune university examinations department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • pune news
  • Pune University
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
2

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
3

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.