Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana : भित्तीपत्रक स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार! व्यंकटेश कॉलेजचा पुढाकार; मान्यवरांनी व्यक्त केले विचार

देऊळगाव राजा येथील व्यंकटेश महाविद्यालय येथे भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 14, 2026 | 03:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

देऊळगाव राजा (ता. प्र.) : स्थानिक व्यंकटेश महाविद्यालय येथे मराठी, अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अतिथी व्याख्यान तसेच राज्यस्तरीय भित्तीपत्रक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Medical College चा ‘धंदा’ आता बंद! NMC च्या ‘या’ ऐतिहासिक निर्णयामुळे Doctor बनण झालं सोपं…

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. प्रदीप घेवंदे, अॅड. अर्चना घेवंदे यांची उपस्थिती होती. तसेच श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी निवेदक धम्मपाल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. यानंतर अॅड. अर्चना घेवंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना महान व्यक्तींच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांनी समाजातील बदलासाठी शिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहन केले. दरम्यान, वाणिज्य व अर्थसंगम ‘विचारवंत ते उद्योजक’ या थीमवर आयोजित राज्यस्तरीय भित्तीपत्रक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत निशा मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाची भाग्यश्री सातपुते आणि छत्रपती संभाजीनगर येथील सर सय्यद महाविद्यालयाची उजमा बानू यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवला. तर श्री व्यंकटेश महाविद्यालयातील जान्हवी तिडके हिने तृतीय क्रमांक मिळवला.

पीसीएम-पीसीबी CET च्या दुसऱ्या संधीसाठी विशेष मुदतवाढ दिली जाणार; 15 एप्रिल ते…

विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी संयोजन समितीला व्यवस्थापन प्रतिनिधी छायाराजे विजयसिंह जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. ज्योती दोकले यांनी केले.

एकंदरीत, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक विषयांवर आपले मत मांडण्याची संधी मिळाली असून त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळाली आहे.

Web Title: Students honored in wall poster competition buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Career
  • education

संबंधित बातम्या

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन
1

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा
2

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा

Beed Inspirational Story: साडी नेसून धावली आणि जिंकली मॅरेथॉन; बीडच्या माऊलीचे सर्वत्र का होतयं कौतुक?
3

Beed Inspirational Story: साडी नेसून धावली आणि जिंकली मॅरेथॉन; बीडच्या माऊलीचे सर्वत्र का होतयं कौतुक?

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!
4

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.