Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhaswad News: म्हसवड पोलीस ठाण्यात गुणवंतांचा सत्कार; डॉ. वैशाली कडूकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना मिळाली यशाची प्रेरणा

Mhaswad News: म्हसवड पोलीस ठाण्यात स्कॉलरशिप परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अप्पर जिल्हा अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वेळ कमी करून स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 10, 2026 | 07:52 PM
गुणवंत

गुणवंत

Follow Us
Follow Us:

motivation Mhaswad News: म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी अप्पर जिल्हा अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, शालेय जीवनातच गुरूजणांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा पाया मजबूत करून आयुष्याचं सोनं करावे.

त्या पुढे बोलताना म्हणतात की, ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले आहे, त्यांच्या या यशाची नशा कायम अंगात राहिली पाहिजे. हे यश नेहमी डोक्यात असले पाहिजे तरच भविष्यात विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे सोपे जाते. आपल्याला चांगले गुरूजण लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.

चौथीपासून मेडिकल कॉलेजपर्यंत स्कॉलरशिपवर शिक्षण पूर्ण

या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मुलींची संख्या जास्त दिसून येत आहे. परमेश्वराने स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव कधीच केला नसून सर्वांना बुद्धी सारखीच दिलेली असते, त्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे वापर करून ध्येय साध्य करावे. मी जेव्हा शालेय शिक्षण घेत होते, तेव्हा चौथी व सातवी इयत्तेत स्कॉलरशिप स्पर्धा होत्या, मी चौथीपासून ते मेडिकल कॉलेजपर्यंत स्कॉलरशिपवर शिक्षण पूर्ण केले याचा मला अभिमान आहे.

Ai Startup: इलॉन मस्कने Twitter मधून काढले; पराग अग्रवालने कसं उभारलं १६,००० कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या सविस्तर

सोशल मीडियाचा वेळ कमी करून स्वावलंबी बना

आपणही शालेय जीवनापासून स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वावलंबी शिक्षण घेत यूपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या माध्यमातून आपल्या पायावर उभे राहणे हे ध्येय असणे गरजेचे आहे, नाहीतर मग मुलींची लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडून किंवा मुलांकडून मदत मागण्यापेक्षा, आत्ताच आपल्या गुरुजनांकडून योग्य मार्गदर्शन घेऊन, सोशल मीडियावरचा वेळ कमी करून, कुठेही वाहवत न जाता आपल्या आयुष्याचे सोने करावे असे आवाहन कडुकर यांनी केले.

Childhood Education Course Australia: ऑस्ट्रेलियात ‘या’ शॉर्ट कोर्सला आहे प्रचंड मागणी; शिक्षण पूर्ण होताच मिळेल त्वरित नोकरी!

या कार्यक्रमांमध्ये क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी विद्यालय तसेच मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिवीर नागनाथ यांना विद्यालयाचे शिक्षक अभिजीत सावंत यांनी केले तर आभार सपोनि संदीप पोमन यांनी मानले. यावेळी डी.वाय.एस.पी रणजीत सावंत, सपोनि संदीप पोमण, क्रांतिवीर नागनाथ अण्णा विद्यालयाच्या सचिव सौ. सुलोचना विश्वंभर बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Mhaswad news police station scholarship students felicitation dr vaishali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • education
  • Latest pune news update
  • Mhaswad

संबंधित बातम्या

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक
1

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

Deemed vs private university: डीम्ड आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये नेमका काय फरक आहे? प्रवेश घेण्यापूर्वी नक्की वाचा!
2

Deemed vs private university: डीम्ड आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये नेमका काय फरक आहे? प्रवेश घेण्यापूर्वी नक्की वाचा!

NTA Reforms: NTA ला पूर्णपणे बंद केले पाहिजे का? युजीसीच्या माजी अध्यक्षांनी दिली अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया… नक्की वाचा!
3

NTA Reforms: NTA ला पूर्णपणे बंद केले पाहिजे का? युजीसीच्या माजी अध्यक्षांनी दिली अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया… नक्की वाचा!

AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!
4

AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.