Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात संविधान तसेच एड्स जनजागरण अभियान! स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात ‘संविधान तसेच एड्स जनजागरण अभियानाचा’ समारोप आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त पार पडला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 05, 2025 | 08:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राज्यशास्त्र विभाग, रेड रिबन क्लब आणि ग्रामीण एड्स नियंत्रण कार्यक्रम केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘संविधान तसेच एड्स जनजागरण अभियानाचा’ समारोप आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त सोमवारी (१ डिसेंबर) पार पडला. या वेळी डॉ. निलेश निंबाळकर यांनी संविधान जनजागरण मार्गदर्शन करताना “युवा पिढीने संविधानाशी जुळणे अत्यावश्यक आहे” असा ठळक संदेश दिला.

IT मध्ये करिअर करायचे आहे? मग BCA आणि MCA मधील अंतर जाणून घ्या

डॉ. निंबाळकर यांनी प्रास्ताविकात २६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या जनजागरण उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयात सलग काही दिवस संविधान साक्षरता, अधिकार-कर्तव्ये, जनजागृती रॅली आणि विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. त्यांनी सांगितले की, आजचा युवक संविधानाविषयी जागरूक राहिला तर देशातील लोकशाही अधिक बळकट होईल.

वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमादरम्यान वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

  • प्रश्नमंजुषा स्पर्धेत तब्बल ५५ विद्यार्थी सहभागी झाले, तर
  • वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान माझा अभिमान, सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवनकार्य, एड्स : घातक व गंभीर आजार अशा विविध विषयांवर प्रभावी मांडणी केली.
वैभव घुले, पूजा मिसाळ, पल्लवी माकोडे यांसारख्या विद्यार्थ्यांनी उत्कट विचार मांडून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी भूषविले. जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील एचआयव्ही-एड्स समुपदेशक डॉ. बोंबटकर आणि समुपदेशिका कु. कुलकर्णी यांसह NSS कार्यक्रमाधिकारी प्रा. निलेश निंबाळकर, प्रा. विनोद बावस्कर, अर्चना जोशी, प्रा. विनय उमरकर, प्रा. सचिन उनडकाट, प्रा. समीर तडवी, प्रा. रामेश्वर सायखेडे आणि प्रा. सिद्धार्थ इंगळे उपस्थित होते. तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

गुजरातमधील विद्यार्थ्यांना झालंय तरी काय? शाळा सोडणाऱ्यांचा टक्का अधिक

डॉ. बोंबटकर यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये विषाणूचा प्रसार, प्रतिबंध, उपचाराची गरज, तसेच समाजातील गैरसमज दूर करण्यावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःसह समाजालाही जागरूक करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समारोपात शैक्षणिक सत्र २०२५–२६ साठी नवीन रेड रिबन क्लबची घोषणा करण्यात आली. रासेयो स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण जनजागरण अभियान प्रभावीपणे पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Students participate in the constitution and aids awareness campaign at shripad krishna kolhatkar college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 08:50 PM

Topics:  

  • amravati
  • Career

संबंधित बातम्या

प्राध्यापक भरती निकषात बदल! शिक्षकांची नाराजी घेण्यात आली ध्यानात, ५०:५० सूत्र लागू होण्याची शक्यता
1

प्राध्यापक भरती निकषात बदल! शिक्षकांची नाराजी घेण्यात आली ध्यानात, ५०:५० सूत्र लागू होण्याची शक्यता

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन
2

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन

Amravati News : अमरावतीत ६२ टक्के पेरणी पूर्ण, रब्बी पिकांमध्ये हरभरा अव्वल
3

Amravati News : अमरावतीत ६२ टक्के पेरणी पूर्ण, रब्बी पिकांमध्ये हरभरा अव्वल

संदेश विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचे ५० प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू
4

संदेश विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचे ५० प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.