Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम

School Bag Weight Guidelines: लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे लक्षात घेता सरकारने शाळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गरज नसलेली अतिरिक्त पुस्तके किंवा वह्या शाळेत आणू नयेत, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 04, 2026 | 11:24 AM
School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शाळांसाठी मोठी बातमी
  • मुलांच्या जड बॅगावर आता शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
  • सर्व शाळांना कडक सूचना
School Bag Weight Limit:  आपण नेहमी पाहतो की, लहान मुलांच्या पाठीवर त्याच्या वजनापेक्षा जास्त बॅग जड असतात. पुस्तक,वह्या, प्रॅक्टिस बुक, डबा, पाण्याची बाटली यासर्वाचे ओझे मुलांच्या असते. त्यामुळे बहुतांश वेळा मुलं वाकून चालतात. कित्येक मुलांच्या पालकांनी जड बॅगेवरुन तक्रार केली आहे. दरम्यान त्यावर आता सरकारने गंभीर दखल सुद्धा घेतली आहे. तसेच सर्व शाळांना कडक सूचना दिल्या आहेत की, मुलांच्या वजनपेक्षा 10 टक्के जास्त वजन असता कामा नये. उदाहरणार्थ…जर मुलांचे वजन 30 किलो असेल तर त्यांच्या पाठीवर फक्त 3 किलो असायला पाहिजे. हा नियम सर्व शाळांना पाळावा लागणार आहे. School Bag Weight Guidelines:

रोजच्या रोज तपासणी होणार

फक्त नियम काढून हा प्रश्न सुटणार नाही, म्हणून शिक्षण विभागाने सांगितले आहे की, प्रत्येक शाळेने मुलांच्या दप्तरांचे वजन तपासावे. तसेच मुख्याध्यापकांनी सुद्धा यावर लक्ष द्यावे. कोणताही मुलगा- मुलगी जास्तीच्या वह्या किंवा पुस्तके तर आणतं नाहीये ना.. असं करत असेल तर सगळी पुस्तक आणू नका असं सांगण्यात यावे.

एक्स्ट्रा साहित्यावर सक्ती

ज्या विषयाचा तास आहे. त्याच विषयाची पुस्तके आणावी. एक्स्ट्रा साहित्यावर सक्ती करण्यात यावी असं स्पष्ट सांगण्यात आले आहे. प्राथमिक आणि माध्यामिक शाळेच्या मुलांना जास्त त्रास होते, त्यांना दररोज सगळ्या विषयाची पुस्तके आणावी लागतात. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आणि पाठीला त्रास होतो. त्यासाठी शाळांनी आपलं वेळापत्रक बदलावे, असे विभागाने सांगितले आहे.

एका दिवशी 4 पुस्तके

विभागाने पुढे हे सांगितले की, शाळांनी असे वेळापत्रक तयार करा की, मुलांना दररोज सगळी पुस्तके आणावी लागणार नाही. दाहरणार्थ सोमवारी 4 विषय असतील तर त्याच 4 विषयांची पुस्तकं आली पाहिजेत. मंगळवारी वेगळे विषय. असं केलं तर दप्तर आपोआप हलकं होईल. हे नियोजन करण्याची जबाबदारी आता शाळांची आहे.केंद्र सरकारने पण सूचना दिल्या होत्या.

DCC Bank Bharti 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘या’ पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर

हे पाऊल एकट्या राज्य सरकारने उचललेलं नाही.

केंद्राच्या शालेय शिक्षण विभागाने 11 ऑगस्टला सगळ्या राज्यांना याबत मार्गदर्शक सूचना पाठवल्या होत्या. केंद्राने सांगितलं होतं की जड दप्तरामुळे मुलांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. पाठदुखी, खांदेदुखी, थकवा असे त्रास लहान वयातच सुरू होतात. त्यामुळे शाळांनी फक्त वजनावर लक्ष ठेवू नये तर पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागरूकता पण करावी.गेल्या काही वर्षांपासून पालक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक हा मुद्दा लावून धरत होते.

Norman Vincent Peale quotes : मोठे स्वप्न पाहणे का गरजेचे आहे? जाणून घेण्यासाठी नॉर्मन विन्सेंट पील यांचे विचार एकदा वाचाच

Web Title: Students school bags must not exceed 10 of their body weigh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • maharashtra government school
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई
1

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई

best engineering branch : १२ वी नंतर इंजिनिअरिंगची कोणती शाखा सर्वोत्तम? करिअर निवडताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
2

best engineering branch : १२ वी नंतर इंजिनिअरिंगची कोणती शाखा सर्वोत्तम? करिअर निवडताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
3

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
4

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.