Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवित्र पोर्टलवरून आता होणार शिक्षक भरती; 31 मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश

जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग खुला झाला आहे. या भरती प्रक्रियेत शासनाने एक बदल केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 06, 2026 | 12:23 PM
पवित्र पोर्टलवरून आता होणार शिक्षक भरती; 31 मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश

पवित्र पोर्टलवरून आता होणार शिक्षक भरती; 31 मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:

मुंबई : अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकणार असून, शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग खुला झाला आहे. या भरती प्रक्रियेत शासनाने एक बदल केला आहे.

केवळ सध्या रिक्त असलेल्या जागाच नव्हे, तर मे २०२६ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य रिक्त पदांचाही यात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, अधिकाधिक पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले असून, १ ते ३१ मे या कालावधीत सर्व शाळा व्यवस्थापनांनी त्यांच्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर जून महिन्यात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार आणि गुणांच्या आधारे शाळांचे पसंतीक्रम (ऑप्शन्स) निवडण्याची संधी मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याने प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक वाढेल.

मुलाखतींविना निवड

भरती प्रक्रियेत वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया होणार असल्याने मानवी हस्तक्षेप पूर्णपणे कमी होणार आहे. तसेच, सर्व शाळांना त्यांच्या आरक्षणानुसार बिंदुनामावली (रोस्टर) तपासूनच जाहिरात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची पदे पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय भरली जाणार आहेत. मात्र, खासगी संस्थांना प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोण ठरणार पात्र?

गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या परीक्षेसाठी सुमारे २ लाख २८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी आपली स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली असून, या पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

Web Title: Teacher recruitment will now be conducted through the pavitra portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Maharashtra Education
  • Pavitra Portal

संबंधित बातम्या

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर
1

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.