Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्या जनगणनेत! १६ मेपासून जनगणना प्रारंभ; शिक्षकांमध्ये नाराजी

राज्यातील शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेच्या कामाचा परिणाम होणार असून नाराजी वाढली आहे. २ मे ते १४ जून सुट्ट्या असल्या तरी १६ मे ते १४ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेवर हजर राहावे लागणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 05, 2026 | 05:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर यंदा जनगणनेच्या कामामुळे परिणाम होणार असून, यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या असल्या, तरी शिक्षकांना १६ मेपासून १४ जूनपर्यंत जनगणनेच्या कामावर हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांची सुट्टी कामातच जाणार आहे.

Alert : ‘Ghost Hiring’ चा सापळा! तुम्हीही अडकू शकता…, 10 पैकी 4 कंपन्या काढताहेत ‘फेक’ भरतीची जाहिरात

जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका तसेच खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, मागील दोन वर्षे शिक्षकांनी निवडणुकीच्या कामात सहभाग घेतला होता आणि आता पुन्हा जनगणनेची जबाबदारी आल्याने त्यांच्या मुख्य अध्यापन कामावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील सुमारे चार ते पाच हजार शिक्षक या जनगणनेच्या कामात गुंतणार आहेत. त्यामुळे अनेकांनी आधीच आखलेले पर्यटन, नातेवाईकांच्या भेटी, लग्नकार्य यांसारखे वैयक्तिक नियोजन बिघडले आहे. वर्षातून एकदाच मिळणारी दीर्घ उन्हाळी सुट्टी अशा प्रकारे कामात गेल्याने शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे.

यंदा जनगणना प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असल्याने शिक्षकांना दारोदारी जाऊन माहिती संकलित करावी लागणार आहे. या कामात महिला शिक्षक, अपंग किंवा आजारी शिक्षकांना सूट देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच, बीएलओचे काम करणाऱ्या आणि एकशिक्षकी शाळांतील शिक्षकांना अतिरिक्त जबाबदाऱ्या देऊ नयेत, अशीही मागणी पुढे येत आहे.

“शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

शासनाने स्पष्ट केले आहे की, सुट्टीच्या काळात जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना त्या बदल्यात विशेष रजा दिली जाईल. मात्र, या प्रक्रियेमुळे नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार असून, त्याआधीच शिक्षकांना जनगणनेचे काम पूर्ण करावे लागणार आहे. एकंदरीत, शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून, त्यांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

Web Title: Teachers summer vacations to be spent on census duty census begins may 16

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
1

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Captain Smit Machhar: जिगरबाज कॅप्टन! रक्ताने लथपथ असतानाही १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार किती शिकलेत? जाणून घ्या
2

Captain Smit Machhar: जिगरबाज कॅप्टन! रक्ताने लथपथ असतानाही १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार किती शिकलेत? जाणून घ्या

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
3

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.