(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
CNBC च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये, दर १० पैकी ४ कंपन्यांनी नोकरीच्या fake जाहिराती प्रकाशित केल्या. या सर्वेक्षणानुसार, आजही दर १० पैकी ३ कंपन्या अशा पदांच्या जाहिराती देत आहेत, जी पदे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. अर्ज केल्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अनेक उमेदवार हताश होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.
ऑर्गेनाइजेशनल साइकोलॉजिस्ट गुरलीन बरुआ यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, कंपन्या अनेक कारणांमुळे घोस्ट जॉब्स म्हणजे बनावट नोकऱ्या पोस्ट करतात. या कारणांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:टॅलेंट पाइपलाइन: भविष्यातील भरती गरजांचा अंदाज घेण्यासाठी उमेदवारांचा डेटा गोळा करण्यासाठी असं करतात
ग्रोथचा दिखावा: गुंतवणूकदारांना असा संकेत देणं की कंपनीचा वेगाने विस्तार होत आहे.
डेटा मॅपिंग: नोकरीच्या अर्जांद्वारे बाजारातील trends आणि उपलब्ध मनुष्यबळाविषयी माहिती गोळा करण्यासाठी
जर तुम्हीही जॉब पोर्टल्सद्वारे अर्ज करून थकला असाल, तर काही धोक्याच्या संकेतांकडे बारकाईने लक्ष द्या. उदाहरणार्थ, सर्वात पहिली गोष्ट जी तुम्ही तपासली पाहिजे ती म्हणजे नोकरीची जाहिरात कोणत्या तारखेला पोस्ट केली गेली आहे. जर एखादे पद एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून रिक्त असेल आणि त्याची जाहिरात वारंवार पुन्हा-पुन्हा दिली जात असेल, तर अशी शक्यता आहे की ती कंपनी सध्या सक्रियपणे भरती करत नाहीये. तसेच, खालील बाबींचाही विचार करा:
Official Careers Page: जर नोकरीची जाहिरात LinkedIn किंवा इतर पोर्टल्सवर दिसत असेल, परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ती उपलब्ध नसेल, तर सावधगिरीने पुढे जा.
थेट संपर्क: LinkedIn द्वारे संबंधित Hiring Manager किंवा HR प्रतिनिधीशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखादे स्पष्ट उत्तर मिळाले नाही, तर ती परिस्थिती संशयास्पद असल्याचे समजावे.
गुरलीन बरुआ उमेदवारांना असा सल्ला देतात की, त्यांनी आपल्या नियंत्रणात असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. नवीन तंत्रज्ञान शिकणे, AI चा प्रभाव समजून घेणे आणि समस्या-निवारणासारखी कौशल्ये विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या एका अहवालानुसार, जसजशी तांत्रिक कामे अधिकाधिक स्वयंचलित होत आहेत, तसतसे मानवी गुणांचे जसे की क्रिटिकल थिंकिंग, इमोशनल इंटेलिजेंस आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची महत्त्व वाढत आहे.
संस्थांनी आपल्या संवादात स्पष्टता राखणे गरजेचे आहे. जरी त्यांना पूर्णपणे पारदर्शक राहणे शक्य नसले, तरीही एखादे पद ‘तात्काळ भरतीसाठी’ उपलब्ध आहे की केवळ ‘भविष्यातील मनुष्यबळ साठा तयार करण्याच्या उद्देशाने’ आहे, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. केवळ देखाव्यासाठी किंवा सोपस्कार म्हणून नोकरीच्या संधी जाहीर केल्यास, उमेदवारांचा संस्थेवरील विश्वास कमी होतो.






