Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Illegal Schools : पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा आकडा समोर; पालकांना प्रवेशाबाबत सावधगिरीचे आवाहन

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व शाळा जून महिन्यापासून सुरू होत असताना, शासनाची मान्यता नसतानाही काही शाळांकडून प्रवेशासाठी जाहिराती करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 08, 2026 | 05:35 PM
विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचे आज 'शाळा बंद' आंदोलन; शिक्षण संचालकांनी तातडीने दिल्या 'या' सूचना

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचे आज 'शाळा बंद' आंदोलन; शिक्षण संचालकांनी तातडीने दिल्या 'या' सूचना

Follow Us
Follow Us:

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व शाळा जून महिन्यापासून सुरू होत असताना, शासनाची मान्यता नसतानाही काही शाळांकडून प्रवेशासाठी जाहिराती करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषदेकडील अहवालानुसार जिल्ह्यातील अनेक शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे ग्रामीण भागातील एकूण २४ शाळा अनधिकृत असल्याचे आढळले असून, त्यापैकी १३ शाळांना शासनाची मान्यता नाही. तर ११ शाळांना मान्यता असली तरी त्या मूळ मंजूर ठिकाणी न भरवता अन्यत्र अनधिकृतरीत्या स्थलांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

 

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात १२ शाळा अनधिकृत असून, त्यापैकी तीन शाळांना केवळ ‘इरादा पत्र’ मिळाले आहे. मात्र, त्यांना अंतिम शासन मान्यता मिळालेली नाही. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नऊ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका शाळेला इरादा पत्र प्राप्त झाले असले तरी अंतिम मान्यता नसल्याने शासन निर्णयानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार

यामुळे पालकांनी शासन मान्यता नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान, अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास संबंधित कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ही माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

हे सुद्धा वाचा : दहावी नापास झाल्यावर काय करावे? जाणून घ्या पुढील करिअर पर्याय आणि पालकांनी घ्यायची काळजी !

पुणे ग्रामीण भागातील अनधिकृत शाळा

  • सेंट झेवियर स्कूल, भोर
  • ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल, हवेली
  • न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर
  • इरा पब्लिक स्कूल, इंदापूर
  • अहिल्या इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर
  • जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल, खेड
  • ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, खेड
  • ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल, खेड
  • छत्रपती शिवाजी राजे विद्यालय, खेड
  • हंपी डंपी फ्री स्कूल, खेड
  • सरस्वती विद्यालय, खेड
  • एंजल हाय, मुळशी
  • क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल, मुळशी
  • श्री रविशंकर विद्या मंदिर, मुळशी
  • चाणक्य जुनिअर कॉलेज,मुळशी
  • सरस्वती क्लासेस, मुळशी
  • रोझलँड इंटरनॅशनल स्कूल, मुळशी
  • एलीट इंटरनॅशनल स्कूल, मुळशी
  • पेरीवेन्कल इंग्लिश मीडियम स्कूल, मुळशी
  • श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल, मुळशी
  • जिजस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, मावळ
  • सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल, मावळ
  • श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल, पुरंदर
  • सेंट चावरा स्कूल, शिरूर

Web Title: There is a large number of unauthorized schools in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Marathi School
  • pune news
  • School news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.