SSC Result 2026
दहावीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे. विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org (१० वी साठी) आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर पाहू शकतात. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता आपल्या करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाकतील. मात्र, कमी गुण मिळालेले किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर पुढे काय करावे हा प्रश्न उभा राहतो.
जर तुम्ही नापास झाला असाल, तर काळजी करू नका. शांतपणे विचार करा की पुढे काय करता येईल. त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
ज्या विषयात नापास झाला असाल, त्या विषयाची पुन्हा परीक्षा द्या. थोडी अधिक मेहनत घ्या. पेपर पुन्हा पुन्हा सोडवा, पाठांतरावर भर द्या. यश नक्की मिळेल.
एखाद्या विषयाची भीती वाटत असेल, तर तुमच्या आजूबाजूच्या हुशार विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घ्या किंवा शिकवणी लावा. थोडा आत्मविश्वास निर्माण करा. चांगल्या लोकांचा सल्ला घ्या आणि तुमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडून मदत मागा. याचा नक्कीच फायदा होईल.
दहावी नापास झाल्यानंतरही विद्यार्थ्यांसाठी अनेक कोर्स उपलब्ध आहेत. हे कोर्स करून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.
1) इलेक्ट्रिशियन
2) फिटर
3) वेल्डर
4) प्लंबर
5) मोटार मेकॅनिक
6) COPA
आपले कौशल्य कसे वाढेल याकडे लक्ष द्या, जेणेकरून मनात कोणताही न्यूनगंड निर्माण होणार नाही. खचून न जाता मानसिक तयारी करा. स्वतःला विचारा — “हे मी करू शकतो.” मग बघा, मनातील भीती कशी दूर होते.
अशा वेळी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
पालकांनी अशा वेळी मुलांशी कसे वागावे?
१) मुलांवर रागावू नका
२) इतरांशी तुलना करू नका
३) मानसिक आधार द्या
४) पुढील पर्याय समजावून सांगा
५) आत्मविश्वास वाढवा
Ans: हे संबंधित बोर्डाच्या नियमांवर अवलंबून असते.
Ans: काही कौशल्य आधारित किंवा तांत्रिक क्षेत्रात पुढे शिक्षण पूर्ण केल्यास संधी मिळू शकते
Ans: होय, काही ITI ट्रेडमध्ये दहावी नापास विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो.






