Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Workplace Etiquette: ऑफिसमध्ये कधीही करू नका ‘या’ ५ गोष्टींबद्दल चर्चा; अन्यथा धोक्यात येऊ शकते तुमचे करिअर!

Workplace Etiquette: ऑफिसमध्ये आपली प्रोफेशनल इमेज कायम ठेवण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी सहकाऱ्यांसोबत कधीही शेअर करू नयेत? जाणून घ्या ऑफिस काम करताना महत्ताच्या टिप्स..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 10, 2026 | 01:43 PM
workplace

workplace

Follow Us
Follow Us:

Workplace Etiquette : आपण आपल्या आयुष्याचा एक मोठा भाग ऑफिस म्हणजेच वर्कप्लेसवर घालवतो. अशा वेळी सहकाऱ्यांसोबत चांगली ट्यूनिंग असणे, हसणे-बोलणे आणि लंच शेअर करणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. अनेकदा कामाचे वातावरण हलके करण्याच्या नादात आपण इतरांना आपले मित्र मानून बसतो आणि त्यांच्यासोबत आपल्या वैयक्तिक गोष्टी शेअर करू लागतो. परंतु लक्षात ठेवा, ऑफिस हे बाहेरील जगापेक्षा वेगळी प्रोफेशनल जागा आहे.

प्रत्येक जागेचे स्वतःचे नियम आणि मर्यादा असतात. ऑफिसमध्ये तुमच्या तोंडून निघालेली एखादी चुकीची गोष्ट किंवा नकळत सांगितलेली वैयक्तिक गोष्ट तुमच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण अशा ५ गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुम्ही वर्कप्लेसवर टाळल्या पाहिजेत.

ऑफिसमध्ये कोणाशीही करू नका या ५ गोष्टींची चर्चा

१. पगार, बोनस किंवा इन्क्रिमेंटची गुप्तता बाळगा

तुमच्या पगाराबद्दल, बोनस किंवा इन्क्रिमेंटबद्दल सहकाऱ्यांसमोर कधीही बोलू नका. ऑफिसमध्ये प्रत्येक व्यक्तीचे पॅकेज आणि कामगिरी वेगळी असते. जेव्हा तुम्ही तुमचा पगार शेअर करता, तेव्हा त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये हेवा, तुलना किंवा असंतोष निर्माण होऊ शकतो. यामुळे ऑफिसचे वातावरण खराब होते आणि मॅनेजमेंटच्या नजरेत तुमची व्यावसायिक प्रतिमा प्रभावित होते.

२. राजकीय आणि धार्मिक विचार

राजकारण आणि धर्म हे अतिशय संवेदनशील विषय आहेत. यावर प्रत्येक माणसाचे स्वतःचे वेगळे आणि ठाम मत असते. ऑफिस लंच किंवा टी-ब्रेक दरम्यान या मुद्द्यांवर वाद निर्माण झाल्यास परस्पर कटूता आणि मतभेद वाढू शकतात. वर्कप्लेसवर प्रोफेशनल वातावरण कायम ठेवण्यासाठी राजकारण आणि धर्माशी संबंधित वादांपासून दूर राहणेच शहाणपणाचे ठरते.

Saint Lucia: जगातील एकमेव देश, ज्याचे नाव एका महिलेच्या नावावर ठेवले आहे; काय आहे यामागील रंजक इतिहास?

३. वैयक्तिक आयुष्यातील अडचणी

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. पण तुमचे घरगुती वाद, जोडीदाराशी झालेली भांडणे किंवा वैयक्तिक आयुष्यातील समस्या ऑफिसमध्ये शेअर करणे टाळा. जेव्हा तुम्ही सतत तुमच्या खाजगी समस्यांचा उल्लेख करता, तेव्हा लोक तुम्हाला गांभीर्याने घेणे सोडून देतात. यामुळे तुमच्या एकाग्रतेवरही परिणाम होतो आणि इतरांना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी मिळते.

4. ऑफिस गॉसिप आणि बॉसबद्दल तक्रार

एखाद्या सहकाऱ्याबद्दल अफवा पसरवणे किंवा बॉसबद्दल पाठीमागून वाईट बोलणे हे तुमच्या करिअरसाठी सर्वात जास्त धोकादायक ठरू शकते. ऑफिसमध्ये गोष्टी खूप वेगाने पसरतात आणि आजचा मित्र उद्या तुमचा प्रतिस्पर्धी बनू शकतो. जर तुम्हाला कामाबाबत किंवा मॅनेजमेंटबाबत कोणतीही अडचण असेल, तर थेट एचआर (HR) किंवा संबंधित व्यक्तीशी बोला, पण इतरांसमोर त्याबद्दल रडगाणे गात बसू नका.

Work Life Balance: हातात दुसऱ्या कामाची ऑफर नसताना तरुणाने चक्क ३३ लाखांची नोकरी का सोडली; काय आहे कारण? जाणून घ्या..

५. जॉब चेंज आणि करिअर प्लॅन

जोपर्यंत तुमच्या हातात दुसऱ्या कंपनीचे पक्के ऑफर लेटर येत नाही आणि तुम्ही राजीनामा देत नाही, तोपर्यंत नोकरी बदलण्याच्या प्लॅनबद्दल कोणाशीही बोलू नका. मॅनेजमेंटला समजले की तुम्ही नोकरी सोडण्याच्या विचारात आहात, तर तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्सपासून दूर ठेवले जाऊ शकते आणि तुमचे प्रमोशन देखील धोक्यात येऊ शकते.

Web Title: Things not to discuss with colleagues at workplace etiquette news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Job
  • office

संबंधित बातम्या

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
1

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
2

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!
3

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
4

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.