Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यशस्वी करिअरसाठी विचारपूर्वक योजना गरजेची; करिअर निवडीसाठी ‘या’ बाबी गरजेच्या

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार योग्य करिअर निवडण्यासाठी स्व-आकलन, मार्गदर्शन आणि नियोजन करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा, शॉर्ट टर्म कोर्सेस आणि उच्च शिक्षणाच्या तयारीत गुंतल्यास उज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा होतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 12, 2025 | 06:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

एक यशस्वी आणि समाधानी करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकरच विचार सुरू करणे आवश्यक आहे. करिअर निवडताना केवळ बाह्य दबावाने किंवा समाजाच्या अपेक्षांमुळे निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी, क्षमता, मर्यादा आणि भविष्याच्या गरजा यांचा सखोल विचार करून योग्य पर्याय निवडला पाहिजे. आपल्याला नेमकं काय करायला आवडतं, कोणत्या क्षेत्रात आपण नैसर्गिकरित्या चांगले आहोत, याचा शोध घेणे हा करिअर प्लॅनिंगचा पहिला टप्पा आहे. अ‍ॅप्टिट्यूड चाचण्या, करिअर गाईडन्स सत्रं, वर्कशॉप्स आणि तज्ज्ञांचा सल्ला यामधून स्वतःला समजून घेता येते.

Delhi FSL Recruitment 2025 : 116 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध

आज पारंपरिक करिअर पर्यायांसोबतच अनेक नवीन आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रं उभी राहत आहेत. डिजिटल मार्केटिंग, डिझायनिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सिक्युरिटी, आर्किटेक्चर, अ‍ॅनिमेशन, गेम डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड संधी आहेत. त्यामुळे अशा नवीन पर्यायांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. केवळ डॉक्टर, इंजिनीअर किंवा सरकारी नोकर्‍या एवढ्यापुरते करिअर मर्यादित ठेवू नये.

१०वीच्या नंतर जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा विचार असेल तर त्यासाठी लवकर तयारी करणे महत्त्वाचे ठरते. NEET, JEE, UPSC, MPSC, SSC, बँक परीक्षा यांसाठी वेळेवर तयारी केली तर यश मिळवणे सोपे होते. या परीक्षांमध्ये स्पर्धा अधिक असल्यामुळे नियोजनबद्ध अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि नियमित सराव आवश्यक आहे. याशिवाय हायर एज्युकेशनसाठी देखील तयारी करावी लागते. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाइन शॉर्ट टर्म कोर्सेसही करावेत, जे त्यांना व्यावसायिक जगात उपयोगी पडतील. जसे की डिजिटल स्किल्स, कम्युनिकेशन, इंग्रजी बोलणे, संगणक वापर, प्रेझेंटेशन कौशल्ये इत्यादी.

मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी! ९४ जागांसाठी भरती; पदवीधर करू शकतात अर्ज

उच्च शिक्षणाची नींवही १०वी नंतरच घालायला हवी. आपल्या निवडलेल्या स्ट्रीममधील विषयांची माहिती, पुढील संधी, अभ्यासक्रम यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. शेवटी, करिअर निवड ही जीवनाचा महत्त्वाचा निर्णय आहे. योग्य माहिती, स्व-आकलन, मार्गदर्शन आणि प्रयत्नांच्या जोरावरच विद्यार्थ्यांचे स्वप्नातील करिअर घडते.

Web Title: Thoughtful planning is necessary for a successful career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • career guide
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस
1

AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस

परीक्षा जवळ आलीये? अजून विषयांचे नाव ठाऊक नाहीत? एका रात्रीत असा करा अभ्यास
2

परीक्षा जवळ आलीये? अजून विषयांचे नाव ठाऊक नाहीत? एका रात्रीत असा करा अभ्यास

8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी, नेवल डॉकयार्डच्या अप्रेंटिससाठी 286 पदांची भरती, अर्जाची माहिती
3

8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी, नेवल डॉकयार्डच्या अप्रेंटिससाठी 286 पदांची भरती, अर्जाची माहिती

Delivery Boy ला किती मिळतो पगार? 36000 महिन्याची कमाई, कसे मिळते पार्सल डिलिव्हरीचे काम
4

Delivery Boy ला किती मिळतो पगार? 36000 महिन्याची कमाई, कसे मिळते पार्सल डिलिव्हरीचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.