Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता मोबाईलवरच बनवा Rent Agreement आणि Affidavit! एका क्लिकवर मिळणार E-Stamp Paper; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

एफिडेविट, एग्रीमेंट आणि सेल्फ डिक्लेरेशन मिळवण्यासाठी आता न्यायालय किंवा नोटरीकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही आता हे काम तुमच्या घरात आरामात बसून, तुमच्या फोनचा वापरून फक्त काही मिनिटांत पूर्ण करू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 06, 2026 | 04:47 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • कार्यालयाच्या पायऱ्या झरवायची गरज लागणार नाही
  • घरबसल्या सरकारमान्य ई-स्टॅम्प पेपर मिळवू शकता
  • एग्रीमेंट आणि एफिडेविट कसे बनवून घ्यावेत?
Make Affidavit Agreement online : डिजिटल इंडियामध्ये, ज्या कामांसाठी पूर्वी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जावं लागायचं आता त्यासाठी रोजरोज कार्यालयाच्या पायऱ्या झरवायची गरज लागणार नाही ती आता सोपी झाली आहेत. एफिडेविट, एग्रीमेंट आणि सेल्फ डिक्लेरेशन मिळवण्यासाठी आता न्यायालय किंवा नोटरीकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही आता हे काम तुमच्या घरात आरामात बसून, तुमच्या फोनचा वापरून फक्त काही मिनिटांत पूर्ण करू शकता आणि सरकारमान्य ई-स्टॅम्प पेपर मिळवू शकता. त्यामुळे या सोप्या डिजिटल प्रक्रियेमुळे तुमचा केवळ वेळच वाचवणार नाही, तर तुमची कागदपत्रे पूर्णपणे वैध आणि सुरक्षित राहतील. पण नेमकी ही प्रक्रिया कशी आहे? समजून घेऊयात. सुरुवात ई-स्टॅम्पपासून करुयात.

Job Alert : महाविद्यालयांमध्ये मोठी भरती जाहीर, प्राध्यापकांसह ग्रंथपाल, पीटी डायरेक्टर पदेही भरली जाणार !

ई-स्टॅम्प पेपर म्हणजे काय?

ई-स्टॅम्प पेपर हा एक डिजिटल स्टॅम्प पेपर आहे, जो कोणत्याही कायदेशीर किंवा वित्तीय डॉक्यूमेंटला वैधता देण्यासाठी वापरला जातो. तो shcilestamp.com सारख्या शासनाने अधिकृत केलेल्या वेबसाइट्सवरून ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येतो. असं समजलं जातं की हे मूलतः पारंपरिक स्टॅम्प पेपरचंच एक डिजिटल स्वरूप आहे.

ई-स्टॅम्प कागदपत्रं कुठे उपयुक्त ठरतात?

ई-स्टॅम्प पेपरचा वापर एफिडेविट, रेंट एग्रीमेंट, पावर ऑफ अटॉर्नी, सेल डीड आणि न्यायालयीन कागदपत्र्यांसारख्या विविध कामांसाठी केला जातो. यामुळे बनावट स्टॅम्प पेपरची समस्या राहत नाही आणि कागदपत्रांची कायदेशीर वैधता सुनिश्चित राहते.

एग्रीमेंट आणि एफिडेविट कसे बनवून घ्यावेत?

  • सगळ्यात अगोदर तुम्हाला shcilestamp.com किंवा डिजिटल स्टॅम्प पेपर जारी करण्याची सेवा पुरवणाऱ्या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुम्ही राज्य निवडा. कारण मुद्रांक शुल्क प्रत्येक राज्यात वेगवेगळे असते. त्यानंतर भाषा निवडा.
  • आता “e-Stamping Services” किंवा “Generate e-Stamp Certificate” या पर्यायावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही स्टॅम्प पेपरसाठीचा अर्ज ऑनलाइन भरू शकाल.
  • वापरकर्त्याचे नाव, पत्ता, दस्तऐवजाचा प्रकार इत्यादी माहिती फॉर्ममध्ये अचूकपणे भरा.
  • दस्तऐवजाच्या प्रकारानुसार स्टॅम्प पेपरची रक्कम निवडा. ही रक्कम तुम्ही बनवत असलेल्या दस्तऐवजाच्या प्रकारावर अवलंबून असणार आहे.
  • तुम्ही आता ऑनलाइन पेमेंट करू शकता.
  • वेबसाइट तुम्हाला स्टॅम्प पेपरची एक PDF देईल, जी तुम्ही लगेच डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या ईमेलवर पाठवून घेऊ शकता.
    आता तुम्ही तुमचे एफिडेविट/एग्रीमेंट वर्ड किंवा पीडीएफमध्ये तयार करून ते डाउनलोड केलेल्या स्टॅम्प पेपरवर चिकटवू शकता किंवा त्याची प्रिंट काढून जोडू शकता.
  • दस्तऐवजाला कायदेशीररित्या वैध करणे आवश्यक असल्यास, अधिकृत नोटरीकडून त्यावर सही आणि शिक्का मारून ते प्रमाणित केले जाऊ शकते.
  • तुमचा दस्तऐवज आता तयार आहे. तुम्ही तो न्यायालय, बँक, घरमालक किंवा इतर कोणत्याही संस्थेकडे वैध नमुना म्हणून सादर करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही घरबसल्या आरामात करार किंवा प्रतिज्ञापत्रांसाठी ई-स्टॅम्प पेपर सहज मिळवू शकता.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

ई-स्टॅम्प पेपर किंवा ऑनलाइन प्रतिज्ञापत्र बनवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम, नेहमी shcilestamp.com सारख्या सरकारी किंवा अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करा. स्टॅम्प पेपरसाठी राज्य निवडताना, त्या राज्याच्या स्टॅम्प ड्युटीची माहिती नक्की वाचा, कारण प्रत्येक राज्याचे नियम वेगवेगळे असतात. अर्ज भरताना, नाव, पत्ता, उद्देश इत्यादी सर्व माहिती अचूकपणे भरा. पेमेंट करताना सुरक्षित गेटवेचा वापर करा. ई-स्टॅम्प पेपर डाउनलोड करा आणि तो सुरक्षित ठेवा. जर दस्तऐवजाला नोटरीकरणाची आवश्यकता असेल, तर ते अधिकृत नोटरीकडून प्रमाणित करून घ्या. चुकीची माहिती किंवा प्रक्रियेमुळे दस्तऐवज अवैध ठरू शकतो.

MHT CET Exam Date 2026: महाराष्ट्र CET परीक्षेचं वेळापत्रक बदललं, जाणून घ्या परीक्षेच्या बदललेल्या तारखा

Web Title: Make affidavit agreement online get instant e stamp paper on mobile phone marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • Career News
  • Marathi News
  • new information

संबंधित बातम्या

Breakfast Price Hike: सर्वसामान्यांचा ‘ब्रेकफास्ट’ महागला! दुधानंतर आता ब्रेडच्या किंमतीतही झाली वाढ; पाहा नवे दर
1

Breakfast Price Hike: सर्वसामान्यांचा ‘ब्रेकफास्ट’ महागला! दुधानंतर आता ब्रेडच्या किंमतीतही झाली वाढ; पाहा नवे दर

Adhikmas Gifts : अधिक मासासाठी काय गिफ्ट घ्यायचं प्रश्न पडलाय ? मग अधिकमास कलेक्शन तुम्ही ट्राय करायलाच पाहिजेत
2

Adhikmas Gifts : अधिक मासासाठी काय गिफ्ट घ्यायचं प्रश्न पडलाय ? मग अधिकमास कलेक्शन तुम्ही ट्राय करायलाच पाहिजेत

Modi Govt Order: बाप रे! Lockdown सारखे निर्देश…  ‘हे’ करु नकात! सरकारने बँकांना नेमका काय दिला आदेश?
3

Modi Govt Order: बाप रे! Lockdown सारखे निर्देश… ‘हे’ करु नकात! सरकारने बँकांना नेमका काय दिला आदेश?

Petrol-Diesel Price Hike: इंधनाचे दर कडाडले! 2022 मध्ये 13 वेळा वाढले होते भाव; जाणून घ्या काय आहे 90 पैशांचा पॅटर्न?
4

Petrol-Diesel Price Hike: इंधनाचे दर कडाडले! 2022 मध्ये 13 वेळा वाढले होते भाव; जाणून घ्या काय आहे 90 पैशांचा पॅटर्न?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.