Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alert : ‘Ghost Hiring’ चा सापळा! तुम्हीही अडकू शकता…, 10 पैकी 4 कंपन्या काढताहेत ‘फेक’ भरतीची जाहिरात

आकर्षक वर्णन, चांगली सॅलरी यांसारखे चांगले मुद्दे पाहून आपण नोकरीला अर्ज करतो पण समोरुन काहीच प्रतिसाद मिळत नाही. बऱ्याचदा फक्त पूर्णपणे मौनाला सामोरं जावं लागतं. पणं असं का होतं? कंपन्या असं का करतात?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 04, 2026 | 07:07 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नोकरी शोधणे हे खूप मोठं आव्हान
  • “घोस्ट हायरिंग” नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रवृत्तीचा उदय
  • कंपन्या असं का करतात?
Fake Job Postings : नोकऱ्यांची कमतरता हा मुद्दा फारच तीव्र आहे. या सगळ्यात नोकरी शोधणे हे खूप मोठं आव्हान आहे. या सगळ्यात बऱ्याचदा अनेक जण जे नोकरीच्या शोधात असतात ते बऱ्याच वेळा विचित्र चक्रव्यूहात अडकलेलं पाहतात. आकर्षक वर्णन, चांगली सॅलरी यांसारखे चांगले मुद्दे पाहून आपण नोकरीला अर्ज करतो पण समोरुन काहीच प्रतिसाद मिळत नाही. बऱ्याचदा फक्त पूर्णपणे मौनाला सामोरं जावं लागतं. या अशाच जाहिरात केलेल्या संधी आणि प्रत्यक्ष होणारी भरती यांमधील याच विसंगतीमुळे “घोस्ट हायरिंग” नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रवृत्तीचा उदय झाला आहे.

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! आता भाषा आणि स्तरानुसार होणार शिक्षण, जाणून घ्या सविस्तर

अहवाल काय सांगतो?

CNBC च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये, दर १० पैकी ४ कंपन्यांनी नोकरीच्या fake जाहिराती प्रकाशित केल्या. या सर्वेक्षणानुसार, आजही दर १० पैकी ३ कंपन्या अशा पदांच्या जाहिराती देत ​​आहेत, जी पदे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. अर्ज केल्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अनेक उमेदवार हताश होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.

कंपन्या असं का करतात?

ऑर्गेनाइजेशनल साइकोलॉजिस्ट गुरलीन बरुआ यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, कंपन्या अनेक कारणांमुळे घोस्ट जॉब्स म्हणजे बनावट नोकऱ्या पोस्ट करतात. या कारणांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:टॅलेंट पाइपलाइन: भविष्यातील भरती गरजांचा अंदाज घेण्यासाठी उमेदवारांचा डेटा गोळा करण्यासाठी असं करतात
ग्रोथचा दिखावा: गुंतवणूकदारांना असा संकेत देणं की कंपनीचा वेगाने विस्तार होत आहे.
डेटा मॅपिंग: नोकरीच्या अर्जांद्वारे बाजारातील trends आणि उपलब्ध मनुष्यबळाविषयी माहिती गोळा करण्यासाठी

घोस्ट नोकरी कशी ओळखावी?

जर तुम्हीही जॉब पोर्टल्सद्वारे अर्ज करून थकला असाल, तर काही धोक्याच्या संकेतांकडे बारकाईने लक्ष द्या. उदाहरणार्थ, सर्वात पहिली गोष्ट जी तुम्ही तपासली पाहिजे ती म्हणजे नोकरीची जाहिरात कोणत्या तारखेला पोस्ट केली गेली आहे. जर एखादे पद एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून रिक्त असेल आणि त्याची जाहिरात वारंवार पुन्हा-पुन्हा दिली जात असेल, तर अशी शक्यता आहे की ती कंपनी सध्या सक्रियपणे भरती करत नाहीये. तसेच, खालील बाबींचाही विचार करा:
Official Careers Page: जर नोकरीची जाहिरात LinkedIn किंवा इतर पोर्टल्सवर दिसत असेल, परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ती उपलब्ध नसेल, तर सावधगिरीने पुढे जा.
थेट संपर्क: LinkedIn द्वारे संबंधित Hiring Manager किंवा HR प्रतिनिधीशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखादे स्पष्ट उत्तर मिळाले नाही, तर ती परिस्थिती संशयास्पद असल्याचे समजावे.

या बदलत्या काळात उमेदवारांनी काय करावे?

गुरलीन बरुआ उमेदवारांना असा सल्ला देतात की, त्यांनी आपल्या नियंत्रणात असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. नवीन तंत्रज्ञान शिकणे, AI चा प्रभाव समजून घेणे आणि समस्या-निवारणासारखी कौशल्ये विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या एका अहवालानुसार, जसजशी तांत्रिक कामे अधिकाधिक स्वयंचलित होत आहेत, तसतसे मानवी गुणांचे जसे की क्रिटिकल थिंकिंग, इमोशनल इंटेलिजेंस आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची महत्त्व वाढत आहे.

पारदर्शकतेची आवश्यकता

संस्थांनी आपल्या संवादात स्पष्टता राखणे गरजेचे आहे. जरी त्यांना पूर्णपणे पारदर्शक राहणे शक्य नसले, तरीही एखादे पद ‘तात्काळ भरतीसाठी’ उपलब्ध आहे की केवळ ‘भविष्यातील मनुष्यबळ साठा तयार करण्याच्या उद्देशाने’ आहे, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. केवळ देखाव्यासाठी किंवा सोपस्कार म्हणून नोकरीच्या संधी जाहीर केल्यास, उमेदवारांचा संस्थेवरील विश्वास कमी होतो.

MCL Recruitment 2026 : अरे वा! विना मुलाखत सरकारी नोकरीची संधी, Coal India मध्ये मेगाभरती, जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?

Web Title: Ghost hiring fake job postings india 2024 impact on job seekers marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • Career News
  • Marathi News
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
1

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
2

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…
4

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.