फोटो सौजन्य - Social Media
मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळाली असून इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी एकूण ९४ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर, चालक, मल्टी टास्क ऑपरेटर, वित्त सहाय्यक, स्टेनोग्राफर, ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स), लॉ असिस्टंट आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उदा. वित्त आणि लेखा सहाय्यक पदासाठी उमेदवाराकडे कॉमर्स शाखेतील पदवी असावी. स्टेनोग्राफर पदासाठी कॉमर्समध्ये पदवी आणि स्टेनोग्राफीचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) पदासाठी संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक आहे, तर इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी आवश्यक आहे.
लॉ असिस्टंट पदासाठी कायद्याची पदवी अनिवार्य आहे. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी, एमएस-सीआयटी आणि टायपिंगचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिशियन पदासाठी तांत्रिक पदवी आवश्यक असून मल्टी टास्क ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी मान्य केली जाईल.
या नोकऱ्या अॅप्रेंटिसशिपअंतर्गत दिल्या जाणार असून त्यामुळे निश्चित कालावधीसाठीच उमेदवारांची नेमणूक होणार आहे. मात्र, या कालावधीत उमेदवारांना कामाचा चांगला अनुभव मिळणार असून भविष्यातील संधींसाठी ती उपयोगी ठरणार आहे. विशेष म्हणजे, अॅप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यावर या नोकरीशी कुठलाही बंधनकारक संबंध राहणार नाही. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवार बिनधास्तपणे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुक उमेदवारांनी NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वेळ न दवडता सर्व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ही संधी मुंबई विद्यापीठात काम करण्याची आहे, जी शैक्षणिक आणि तांत्रिक दोन्ही क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी ठरू शकते.