Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफच्या गोळीबाराच्या घटनेनंतर एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या तातडीच्या भेटीवरून राम पूर्णेकरांनी संताप व्यक्त केला आहे. वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणात आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी दसऱ्यानंतर एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 19, 2026 | 03:41 PM
Ram purnekar on Eknath shinde

Ram purnekar on Eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • टायगर श्रॉफच्या भेटीवरून राम पूर्णेकरांचा संताप
  • शिवसैनिकाच्या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याचा आरोप
  • प्रदीप पूर्णेकर प्रकरणात आरोपींच्या अटकेची मागणी
 

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईसारख्या शहरात बॉलिवूड स्टार्सवर गोळीबाराच्या घटना घडत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्यातच आता राज्याच्या राजकारणात एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट दिल्याचा संदर्भ देत ठाण्यातील ठाकरे गटाचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणात न्यायासाठी वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. (Pradeep Purnekar Case)

20 मिनिटांचं अंतर, तरीही भेट नाही!

राम पूर्णेकर यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्या घरापासून त्यांचं घर अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. टायगर श्रॉफच्या प्रकरणात तातडीने हालचाली झाल्या, मग आपल्या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी आणि न्यायाचं आश्वासन देण्यासाठी कोणी पुढाकार का घेतला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

CM Devendra Fadnvis यांचा मोठा निर्णय, सरकारी खर्चात 20% कपात, लाडकी बहीण योजनेलाही धक्का?

“माझे वडीलही शिवसैनिक होते. त्यांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबाच्या वेदना समजून घेण्यासाठी कोणी आलं नाही. आम्हाला सहानुभूतीचे शब्द नकोत, न्याय हवा आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात कारवाईची मागणी

वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत राम पूर्णेकर यांनी तपास आणि आरोपींच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केले. काही व्यक्तींविरोधात पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला असून, संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा सवाल केला आहे.

पप्या शिंदे आणि राजा शिंदे यांच्या चौकशीचा उल्लेख करत त्यांनी इतर संशयितांबाबतही पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावीत, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्या आरोपांबाबत तपास यंत्रणांची अधिकृत भूमिका समोर येणं महत्त्वाचं आहे.

दसऱ्यानंतर एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर उपोषण

राम पूर्णेकर यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे. दसरा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर साखळी उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. आरोपींना अटक करून आपल्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

“माझ्या आईला विधवा केलं. आमच्या कुटुंबाच्या भावनांचं काय?” असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. आता या प्रकरणात संबंधित यंत्रणा काय भूमिका घेणार, आरोपींबाबत पुढे कोणती कारवाई होणार आणि राम पूर्णेकरांच्या मागण्यांवर सरकारकडून काही प्रतिसाद मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Mira Bhayandar: महासभेत हाणामारी, तरीही शेकडो कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी; भाजपच्या कारभारावर विरोधकांचा आक्षेप; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: राम पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदेंवर नाराजी का व्यक्त केली?

    Ans: टायगर श्रॉफच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट दिल्याच्या घटनेचा संदर्भ देत राम पूर्णेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

  • Que: राम पूर्णेकर कोणत्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत?

    Ans: प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणात संबंधित आरोपींना अटक करावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • Que: राम पूर्णेकर यांचं उपोषण कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: राम पूर्णेकर यांनी दसरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Pradeep purnekar case eknath shinde tiger shroff ram purnekar justice protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Pradeep Purnekar
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!
1

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!

Tiger Shroff Firing : मुंबई हादरली! जुहूमध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार
2

Tiger Shroff Firing : मुंबई हादरली! जुहूमध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार

Tiger Shroff: आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात
3

Tiger Shroff: आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात

हल्लेखोर डरपोक, कुठेतरी लपून बसतात अन्…; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4

हल्लेखोर डरपोक, कुठेतरी लपून बसतात अन्…; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.