
शिक्षकांचा आजचा मोर्चा स्थगित, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अहिरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला निर्णय (फोटो सौजन्य-X)
मुंबई : मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने सोमवार, १९ जानेवारी रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनियमिततेच्या विरोधात वाशी येथील मुंबई विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. परंतु शिक्षक संघटनेच्या मागण्यांसंदर्भात विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी संघटनेचे पदाधिकारी शिष्टमंडळ आणि मुंबई विभागीय उपसंचालक यांच्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आला. दरम्यान मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात येणारा आपला मोर्चा स्थगित केला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने दिलेल्या मोचांची विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी गंभीर दखल घेऊन त्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ व सहसंचालक सुनील सावंत ह्यांनाही या बैठकीस बोलावले होते.
या बैठकीत त्यांनी शिक्षक समस्यांची तीव्रता जाणून घेतली. मुंबई विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप सगवे यांच्या विरोधातील चौकशीची प्रक्रिया समाप्त झाली असून त्याबाबतची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली असल्याचे यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीमध्ये मुंबईतील शिक्षकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण केले जाईल असे शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी सांगितले, नियमांचे पालन व्हावे व नियमानुसार प्रक्रिया घडली नसेल तर त्यात सुधारणा करावी असे त्यानी संबंधितांना सांगितले. विशेषत: शिक्षकाच्या नियुक्ती मान्यता, वेतन निश्चितीकरण या बाबी महत्वाच्या असून त्याबाबत विलय कैला जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल असेही कंकाल यांनी सांगितले, शिक्षकांना एका आठवडात शालार्थ दिले जातील, असे राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले. शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, वेतनपथक अधीक्षक यांची येत्या १५ दिवसात एकत्रित बैठक घेऊन शिक्षक समस्थांचे निराकरण केले जाईल असा निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्यांक सस्यांबाबत वरिष्ठ कार्यालयास पत्रे पाठवली असून त्याबाबत पाठपुरावा केला जाईल, उत्तरपत्रिका तपात्तणी बाबत पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे सांगून अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी संघटनेस हा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली.
या चर्चेत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आधळकर, महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. रवींद भदाणे, महासंघाचे माजी उपाध्यक्ष प्रा सुनील पूर्णपात्रे, मुंबई विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश दीक्षित, मुंबई जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. अमर सिंह, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. सुरेश अहिरे, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. भानुदास बिरादार, सचिव प्रा. शामसुंदर कीर्तने, पालघर जिल्ह्याचे सचिव प्रा. विलास खोपकर, खजिनदार प्रा. मनीदन्नन, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र शिंदे यांनी या चर्वेत सहभाग घेतला होता. त्यानंतर शनिवारी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेवी बैठक होऊन अध्यक्षांच्या विनंतीस मान देऊन सोमवारचा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, समस्यांचे निराकरण पंधरा दिवसांत झाले नाही तर पुन्हा मोचों आयोजित केला जाईल असा इशारा विभागीय संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आआंधळकर यांनी दिला.