Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Supervisor Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांची भरती; जाणून घ्या पात्रता

UIDAI Aadhaar Supervisor Recruitment 2026: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) देशातील २५ राज्यांमध्ये आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी ४१९ जागांची भरती जाहीर केली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 14, 2026 | 11:33 AM
adhar

adhar

Follow Us
Follow Us:

UIDAI Aadhaar Supervisor Recruitment 2026: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार सुपरवायझर भरती २०२६ अंतर्गत सुपरवायझर आणि ऑपरेटर या पदांसाठी एकूण ४१९ जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती देशातील २५ राज्यांमध्ये केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आपल्या संबंधित राज्याची अधिकृत अधिसूचना वाचून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख सर्व राज्यांसाठी वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे उमेदवारांनी आपल्या राज्याच्या अंतिम तारखेकडे विशेष लक्ष द्यावे.

या भरती मोहिमेअंतर्गत सर्वाधिक १६१ जागा कर्नाटक राज्यात आहेत. याशिवाय बिहारमध्ये १०९, उत्तर प्रदेशमध्ये २९, पश्चिम बंगालमध्ये २५, छत्तीसगडमध्ये १८, हरियाणामध्ये १५, तर झारखंड आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी १२ जागा भरल्या जातील. इतर राज्ये जसे की मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, आसाम, सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरा येथेही विविध पदांवर नियुक्त्या केल्या जातील.

उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज करण्यापूर्वी त्यांनी आपल्या राज्याची अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. तसेच अर्जादरम्यान आवश्यक कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी आणि लॉगिनशी संबंधित माहिती आधीच तयार ठेवावी, जेणेकरून तांत्रिक अडचणीच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही.

NEET UG 2026 Re-Exam: नीट यूजी पुनर्परीक्षेची ओएमआर (OMR) शीट जाहीर! ‘या’ तारखेला लागणार अंतिम निकाल!

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी उमेदवार 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे 2 वर्षांचा आयटीआय़ किंवा 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

विशेष अट: याशिवाय उमेदवाराकडे युआयडीएआय (UIDAI) द्वारे अधिकृत एजन्सीने जारी केलेले वैध ‘आधार सुपरवायझर/ऑपरेटर प्रमाणपत्र’ (Aadhaar Supervisor/Operator Certificate) असणे अनिवार्य आहे. तसेच कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

किमान वय: १८ वर्षे तर कमाल वय् राज्यनिहाय अधिसूचनेनुसार निश्चित असेल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसर वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Govt Jobs: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकरीची संधी! आयटीआय उत्तीर्ण ते इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरू; पाहा पात्रता

अर्ज कसा करावा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम युआयडीएआयच्या (UIDAI) अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तिथे भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी आणि ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी. अर्ज शुल्क लागू असल्यास त्याचे ऑनलाईन पेमेंट करावे. शेवटी अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआऊट किंवा पीडीएफ आपल्याकडे सुरक्षित ठेवावी.

Web Title: Uidai aadhaar supervisor recruitment 2026 apply online eligibility criteria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • aadhar
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Govt Jobs: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकरीची संधी! आयटीआय उत्तीर्ण ते इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरू; पाहा पात्रता
1

Govt Jobs: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकरीची संधी! आयटीआय उत्तीर्ण ते इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरू; पाहा पात्रता

ONGC Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! दरमहा मिळणार ७० हजारांपेक्षा जास्त पगार
2

ONGC Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! दरमहा मिळणार ७० हजारांपेक्षा जास्त पगार

Government Jobs 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये हवालदार पदांची मोठी भरती; १० वी पास असणाऱ्यांना उत्तम संधी!
3

Government Jobs 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये हवालदार पदांची मोठी भरती; १० वी पास असणाऱ्यांना उत्तम संधी!

Indian Navy Recruitment 2026: नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! घरबसल्या असा करा अर्ज?
4

Indian Navy Recruitment 2026: नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! घरबसल्या असा करा अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.