Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

Nav Bharat Saaksharta Karyakram: केंद्र सरकारच्या 'उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा'अंतर्गत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी साक्षरतेचा टप्पा गाठला असून, देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 21, 2026 | 03:15 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश
  • प्रौढांना शिकवण्यात आघाडीवर असलेली राज्ये 
  • काय आहे हा उपक्रम?
Nav Bharat Saaksharta Karyakram: देशाला शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार नेहमी प्रयत्नशील असते. केंद्र सरकारच्या प्रौढ साक्षरता उपक्रमांतर्गत म्हणजेच ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत’ (ULLAS Nav Bharat Saaksharta Karyakram) ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ते साक्षर असल्याचे घोषित केले आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या 90.96 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘फाउंडेशन लिटरेसी अँड न्यूमरेसी असेसमेंट टेस्ट’मध्ये सहभाग घेतला आहे. या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे देशाचा साक्षरता दर वाढून 81.1 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

प्रौढांना शिकवण्यात आघाडीवर असलेली राज्ये 

या कार्यक्रमांतर्गत घोषित करण्यात आलेल्या साक्षर राज्यामध्ये मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये लडाख, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू-काश्मीर आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे.

पुण्यात CSIR-NCL मध्ये भरती सुरू! ७ डिसेंबरपर्यंत करता येईल ऑनलाइन अर्ज; किती मिळणार मानधन?

कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 95 टक्के साक्षरता दर हे पूर्ण साक्षरतेचे लक्षण मानले जाते; कारण काही नागरिकांचे जास्त वय आणि बौद्धिक अक्षमता यांसारख्या कारणांमुले वाचण्या-लिहण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 100 टक्के साक्षरता व्यवहार्य नसते.

शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत एकूण 4.15 कोटी विद्यार्थ्यांनी FLNAT परीक्षा दिली असून त्यांचा यशाचा दर 90 टक्क्यांहून अधिक राहिला आहे. या सर्व राज्याच्या कामगिरीमध्ये महाराष्ट्रात 6.5 लाख प्रौढ विद्यार्थ्यांची नोंद आहे.

Aeronautical Engineering Career: आकाशात झेप घेण्याची संधी! बारावीनंतर कसे बनावे एयरोनॉटिकल इंजिनिअर? जाणून घ्या

काय आहे हा उपक्रम?

केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर नागरिकांना शिक्षित करणे हा आहे. यामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, महत्त्वाची जीवनकौशल्ये, मूलभूत शिक्षण, व्यवसायिक कौशल्ये आणि निरंतर शिक्षण या पाच प्रमुख मुद्यांचा समावेश आहे. शाळा, उच्च शिक्षण संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी तत्वावर हायब्रीड मोडमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: या उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे देशाचा साक्षरता दर कितीवर पोहोचला आहे?

    Ans: शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे देशाचा साक्षरता दर वाढून ८१.१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

  • Que: कोणत्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना साक्षर घोषित करण्यात आले आहे?

    Ans: राज्यांमध्ये मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंड, तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये लडाख, चंदीगड, अंदमान-निकोबार बेटे, जम्मू-काश्मीर आणि लक्षद्वीप यांचा यामध्ये समावेश आहे.

  • Que: 'उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम' कसा राबवला जातो?

    Ans: १५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निरक्षर नागरिकांसाठी हा उपक्रम शाळा, उच्च शिक्षण संस्था आणि लोकसहभागातून स्वयंसेवी तत्त्वावर हायब्रीड मोडमध्ये चालवला जातो, ज्यामध्ये साक्षरता, संख्याज्ञान, जीवनकौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये आणि निरंतर शिक्षणावर भर दिला जातो.

Web Title: Ullas nav bharat saaksharta karyakram literacy rate 81 percent marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • central goverment
  • education
  • Marathi News

संबंधित बातम्या

NCP Politics: फडणवीसांवरील आरोपांवर आदिती तटकरे यांनी सोडलं मौन; नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या
1

NCP Politics: फडणवीसांवरील आरोपांवर आदिती तटकरे यांनी सोडलं मौन; नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या

Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त
2

Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त

Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली
3

Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mumbai News: ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक! प्रतिटन 7 हजारांच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन
4

Mumbai News: ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक! प्रतिटन 7 हजारांच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.