Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली

गेल्या काही दिवसांपासून सिंदेवाही परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पावसाच्या भीतीने शेतकरी शक्य तितक्या लवकर कापणी आणि मळणीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2026 | 01:53 PM
Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Follow Us
Follow Us:
  • ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता
  • अवकाळी पाऊस झाल्यास धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता
  • ढगाळ वातावरणामुळे शेतातील कामांवरही परिणाम
सिंदेवाही: खरीप हंगामातील धान पीक कापणीच्या टप्यावर आले असताना परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आभाळ दाटून येत असल्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असून, शेतात उभे असलेले धान पीक या संभाव्य संकटाच्या सावटाखाली आले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. सिंदेवाही व लोणवाही परिसरात खरीप हंगामातील धानाचे पीक सध्या परिपक्वतेच्या अवस्थेत असून अनेक शेतांमध्ये कापणीची कामे सुरू झाली आहेत.

kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल

काही शेतकऱ्यांनी धान कापून शेतात ठेवले आहे, तर काही ठिकाणी मळणीची तयारी सुरू आहे. मात्र, अचानक वातावरणात बदल होऊन आभाळ भरून आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पावसाच्या भीतीने शेतकरी शक्य तितक्या लवकर कापणी आणि मळणीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ऐन कापणीच्या आणि मळणीच्या काळात अवकाळी पाऊस झाल्यास धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

कापून शेतात ठेवलेले धान भिजल्यास दाण्यांचा रंग बदलणे, काळे पडणे, गुणवत्ता खालावणे आणि बाजारभाव कमी मिळणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच शेतात उभे असलेले पीक पावसामुळे जमिनीवर लोळल्यास कापणी आणि मळणीची कामे अधिक कठीण होऊन उत्पादनात घट होण्याची भीती आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि शेतीकामांसाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरला आहे. अशातच कापणीच्या तोंडावर हवामानातील बदलामुळे निर्माण झालेल्या संकटाने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढवली आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतातील कामांवरही परिणाम होत असून, मजुरांची उपलब्धता, कापणीसाठी लागणारी साधने आणि मळणीची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अनेक शेतकरी पीक सुरक्षित करण्यासाठी धान कापून बांधणी करण्यावर भर देत आहेत. मात्र, पाऊस पडल्यास कापलेले धान वाचविणे कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

तारळी प्रकल्पाला MPCB चा थेट ‘स्टॉप वर्क’ आदेश; अदानी प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे निर्देश

शेतीवर दुबार संकट

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा हंगाम पुन्हा संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. पिकाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्याना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू नये, यासाठी हवामानाच्या अंदाजानुसार शेतीची कामे पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता असून, त्यामुळे परिसरातील बळीराजा सध्या आभाळाकडे नजर लावून बसला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Unseasonal rain threatens paddy crops in chandrapur farmers worried as harvest season begins hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Mumbai News: ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक! प्रतिटन 7 हजारांच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन
1

Mumbai News: ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक! प्रतिटन 7 हजारांच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन

टाटा समूहात मोठ्या घडामोडी! TATA Son’sचा वाद सुरू असतानाच ट्रस्टचे 5 महत्त्वाचे निर्णय
2

टाटा समूहात मोठ्या घडामोडी! TATA Son’sचा वाद सुरू असतानाच ट्रस्टचे 5 महत्त्वाचे निर्णय

पुण्यात CSIR-NCL मध्ये भरती सुरू! ७ डिसेंबरपर्यंत करता येईल ऑनलाइन अर्ज; किती मिळणार मानधन?
3

पुण्यात CSIR-NCL मध्ये भरती सुरू! ७ डिसेंबरपर्यंत करता येईल ऑनलाइन अर्ज; किती मिळणार मानधन?

India’s Top Philanthropists 2026: अंबानी-अदानींनाही टाकलं मागे! देशातील सर्वात मोठा दानशूर उद्योगपती कोण?
4

India’s Top Philanthropists 2026: अंबानी-अदानींनाही टाकलं मागे! देशातील सर्वात मोठा दानशूर उद्योगपती कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.