Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त

खारेपाट भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आता या भागांमध्ये तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2026 | 02:21 PM
Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त

Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त

Follow Us
Follow Us:
  • अनेक गावांमध्ये रात्री उशिरा, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास पाणी सोडले जाणार
  • अनेक कुटुंबांसमोर पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान
  • दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नियोजन
पेण: तालुक्यातील खारेपाट भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आधी दोन दिवसांतून तिसऱ्या दिवशी मिळणारे पाणी आता तीन दिवसांच्या अंतराने, म्हणजेच चार दिवसांतून एकदा मिळणार आहे. या बदलामुळे खारेपाटातील नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे.

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल

आधीच अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, त्यात आता तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाहता अनेक गावांमध्ये रात्री उशिरा, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे दिवसभर शेतात कष्ट करून घरी परतणाऱ्या शेतकरी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्री-अपरात्री जागे राहण्याची वेळ येणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

विशेषतः महिलांना घरातील स्वयंपाक, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि इतर दैनंदिन कामांचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. पाणी येण्याची वेळ रात्रीची असल्याने घरातील कामे बाजूला ठेवून पाण्याची वाट पाहावी लागणार आहे. पाणी साठवून ठेवण्याची मर्यादा असल्याने अनेक कुटुंबांसमोर पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

…तर टंचाईचा प्रश्न उद्भवला नसता

पेण तालुक्यातील हेटवणे धरण हे येथील स्थानीक नागरीकांच्या जमीनी संपादीत करून बांधण्यात आले आहे मग या धरणावर प्रथम अधिकार पेण तालुक्यातील जनतेचा आहे. पण तसे न होता या धरणातील पाणी मुंबईतील नागरिकांना दिला जातो. जर का हेटवणे धरणाचे पाणी पेण तालुक्यातील जनतेला दिले आसते तर ही पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवला नसता याला जबाबदार कोण येथील लोकप्रतिनिधी की प्रशासकीय अधिकारी.

कायमस्वरूपी उपाययोजना कधी

दरम्यान, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद उपविभाग पेण यांच्या कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाठविण्यात आले आहे. कमी पर्जन्यमानामुळे पाणी उपलब्धतेवर परिणाम झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार वडखळ, वाशी, खारेपाट तसेच इतर विभागांतील गावांसाठी वेगवेगळ्या वेळामध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. मात्र, पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्याऐवजी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना त्यासाठी नागरिकांना चार दिवस प्रतीक्षा करावी लागणे ही चिंतेची चाब आहे. दिवसभर शेतात राबायचे आणि रात्री पाण्यासाठी जागायचे, अशी वेळ खारेपाटातील जनतेवर आणू नका! पाणीटंचाईच्या नावाखाली नागरिकांच्या झोपेचा आणि दैनंदिन जीवनाचा प्रश्न निर्माण होऊ नये.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Water crisis worsens in pens kharepat region residents to get water once every four days hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर
1

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

NCP Politics: फडणवीसांवरील आरोपांवर आदिती तटकरे यांनी सोडलं मौन; नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या
2

NCP Politics: फडणवीसांवरील आरोपांवर आदिती तटकरे यांनी सोडलं मौन; नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या

Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली
3

Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mumbai News: ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक! प्रतिटन 7 हजारांच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन
4

Mumbai News: ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक! प्रतिटन 7 हजारांच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.