
CRANE
Dubai Crane Operator Salary: दुबईच्या गगनचुंबी इमारती आणि तिथले रस्ते आपण सर्वांनीच पाहिले आहेत. या भव्य इमारतींच्या उभारणीत क्रेन चालवणाऱ्या मजुरांचे मोलाचे योगदान असते. उत्तराखंडचे रहिवासी बलविंदर सिंग हे २००५ पासून म्हणजेच तब्बल २० वर्षांहून अधिक काळ क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत आहेत. नुकतीच कंटेंट क्रिएटर जगदीश चावला यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून बलविंदर सिंग यांची मुलाखत शेअर केली असून, ती सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मुलाखतीदरम्यान बलविंदर सिंग यांनी सांगितले की, ते दुबईमध्ये क्रेन चालवून महिन्याला १ लाख ते १.७ लाख रुपये (सुमारे ४,००० ते ४,५०० AED) सहजासहजी कमावतात. मात्र, त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की सर्वच ऑपरेटरना इतका पगार मिळतो असे नाही. पगार हा खालील गोष्टींवर अवलंबून असतो:
अनुभव (Experience): बलविंदर सिंग यांना २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांची कमाई अधिक आहे.
कंपनी आणि कामाचे स्वरूप: क्रेनचा प्रकार, कामाचे तास आणि कंपनीच्या अटीनुसार पगारात बदल होतो.
बलविंदर सिंग यांच्या मते, क्रेन ऑपरेटर बनण्यासाठी कोणत्याही विशेष पदवी किंवा कोर्सची गरज नाही.
परवाना (Licence): सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैध क्रेन ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे.
लायसन्सचा खर्च: कंटेंट क्रिएटर जगदीश चावला यांनी स्पष्ट केल्यानुसार, दुबईत क्रेन ऑपरेटरचे लायसन्स मिळवण्यासाठी ६,००० ते ७,००० AED इतका खर्च येतो, जो स्वतःच करावा लागतो.
UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!
बलविंदर सिंग यांनी स्वतःचा व्हिसा आणि ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्याच खर्चाने मिळवले होते. मेहनत करण्याची तयारी असेल, तर तरुणांनी नक्कीच दुबईत येऊन आपले भवितव्य घडवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.