Career In AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे? Google-Microsoft सह या कंपन्या ऑफर करतायत टॉप-5 फ्री कोर्स
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टेक कंपनी गुगलच्या जेमिनी किंवा ओपनएआयच्या चॅटजीपीटीसोबत इतर अनेक AI चॅटबोट बाजारात उपलब्ध आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण असो किंवा आपली असाईमेंट पूर्ण करणं असो, आपण आपल्या अनेक कामांसाठी गुगलसोबतच AI चा देखील वापर करतो. खरं तरं काही वर्षांपूर्वीच विचार केला तर लोकांना AI काय आहे, त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत माहिती देखील नव्हती. हल्ली अनेकांना या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. तर आता आम्ही तुम्हाला काही कंपन्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या फ्री कोर्स ऑफर करतात.
पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार वार्षिक परीक्षा
ज्या लोकांना जनरेटिव्ह AI शिकण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टचा हा कोर्स बेस्ट आहे. हा कोर्स नवीन विद्यार्थी आणि AI मधील तज्ञांसाठी आहेत. हा कोर्स समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग माहित असण्याचीही गरज नाही. मायक्रोसॉफ्ट लर्नद्वारे आयोजित या कोर्समध्ये मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला उदाहरणांद्वारे पायथॉन आणि टाइपस्क्रिप्ट एकत्र शिकण्याची संधी मिळेल. त्यात एकूण 18 धडे आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलद्वारे ऑफर केला जाणारा गुगल प्रॉम्प्टिंग इसेन्शियल्स कोर्स 10 तासांचा आहे आणि तो कोर्सएरावर उपलब्ध आहे. या कोर्समध्ये, तुम्हाला AI तज्ञांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे आणि रियूजेबल प्रॉम्प्टच्या मदतीने एक लायब्ररी तयार करता येईल. यामध्ये गुगल AI तज्ञांचे व्हिडिओ, AI सोबतचा सराव आणि मूल्यांकन देखील समाविष्ट आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र देखील मिळेल. गुगलच्या मते, सरासरी यशस्वी प्रॉम्प्टमध्ये 21 शब्द असतात. तथापि, डेटा असे सूचित करतो की युजर्सचे प्रॉम्प्ट बहुतेकदा लहान असतात, ज्यामध्ये नऊ किंवा त्यापेक्षा कमी शब्द असतात. हा कोर्स युजर्सना प्रॉम्प्ट योग्यरित्या लिहिण्यास मदत करतो.
हा गुगल क्लाउड कोर्स कोर्सेरा प्लसवर उपलब्ध आहे. याचा अभ्यास करण्यासाठी सात लाख लोकांनी आधीच नोंदणी केली आहे. कोर्सचा अभ्यास करण्यासाठी, अनुभवाची आवश्यकता नाही किंवा कडक वेळापत्रक पाळण्याची आवश्यकता नाही. यामध्ये जनरेटिव्ह AI च्या व्याख्या आणि कार्यपद्धती, विविध प्रकारच्या जनरेटिव्ह AI मॉडेल्सची माहिती आणि त्यांचे अनुप्रयोग समाविष्ट आहेत. कोर्स पूर्ण केल्यावर, तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल जे तुम्ही तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये जोडू शकता. हा कोर्स इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंचसह 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यात एक असाइनमेंट देखील आहे.
लिंक्डइन लर्निंगचा हा कोर्स प्रोजेक्ट आणि प्रोडक्ट मॅनेजर, डायरेक्टर, एक्जीक्यूटिव आणि AI मध्ये करिअर सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केला आहे. तथापि, ज्यांना AI ची मूलभूत माहिती शिकायची आहे ते देखील या मोफत कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. हा कोर्स तुम्हाला एखाद्या सिस्टमने इंटेलिजेंस प्रदर्शित करण्याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यास मदत करेल. हे प्रेडिक्टिव्ह AI आणि जनरेटिव्ह AI, मशीन लर्निंग अल्गोरिदम, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स, फाउंडेशन मॉडेल्स आणि डीप लर्निंगमधील फरक स्पष्ट करते.
राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 54 वसतीगृहे सुरू; आणखी 18 लवकरच कार्यान्वित
हा कोर्स कोर्सेरावर देखील उपलब्ध आहे आणि ज्यांना सुरुवातीपासूनच AI बाबत शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम आहे. यात चार मॉड्यूल आहेत आणि 17 लाखांहून अधिक लोकांनी या कोर्ससाठी नोंदणी केली आहे. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी सुमारे 6 तास लागतात आणि पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. हा कोर्स 23 भाषांमध्ये उपलब्ध आहे.