Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : निकष न पूर्ण करणाऱ्या शाळांवर कारवाई; वाशिममधील २१ शाळांतील ३९ तुकड्या अपात्र

राज्यातील ३२४ शाळा व ४१२ तुकड्यांना वेतन अनुदानासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील २१ शाळांतील ३९ तुकड्यांचा या निर्णयात समावेश आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 07, 2026 | 03:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील ३२४ माध्यमिक शाळा व ४१२ तुकड्यांना वेतन अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात आले आहे
  • वाशिम जिल्ह्यातील २१ शाळांमधील ३९ तुकड्यांचा त्यात समावेश आहे
  • अद्ययावत आधार अहवाल तसेच आरटीई मान्यतेशी संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे
वारंवार मूल्यांकन होऊनही निकष पूर्ण न करणाऱ्या राज्यातील ३२४ माध्यमिक शाळा व ४१२ तुकड्यांना वेतन अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून वाशिम जिल्ह्यातील २१ शाळांमधील ३९ तुकड्यांचा त्यात समावेश आहे. राज्य शासनाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला.

Career Tips : Private Job सोबतच करा सरकारी नोकरीची तयारी ! ‘हे’ आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय

शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयानुसार संबंधित शाळांना आता स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर मान्यता मिळवण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत शाळांनी आवश्यक कागदपत्रांसह संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. अर्जासोबत शाळा मान्यता आदेश, अद्ययावत आधार अहवाल तसेच आरटीई मान्यतेशी संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळील अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळांमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना १ मे ते ३१ मे या कालावधीत नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उन्हाळी सुटीत प्रत्यक्ष समायोजनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Chh Sambhajinagar : ‘हे’ आहेत राज्यातील आदर्श शिक्षक मंडळी! राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण 

तसेच मान्यता रद्द झालेल्या शाळांना यूडायस प्लस आणि सरल पोर्टलमधून वगळण्याची प्रक्रिया ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. विहित मुदतीत परिपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या शाळांनाच पुढील प्रक्रियेत संधी दिली जाणार आहे. दरम्यान, निर्धारित मुदतीत अर्ज न करणाऱ्या शाळांची मान्यता आपोआप रद्द होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे संबंधित शाळांचे भवितव्य आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पुढील काही दिवसांत शाळा व्यवस्थापन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Washim news action against schools failing to meet criteria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा
1

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
2

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी
3

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे
4

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.