
Washim sonal Ekburji Dam Water Shortage
मात्र, काहींनी यामध्ये व्यत्य आणून दुसरा होणारा प्रकल्प थांबविल्याचे चर्चा आहे. त्यामुळेच आता वाशिमवासीयांना यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे या प्रकल्पात अवघे ३२ टक्के पाणीसाठा आहे. सध्या हिवाळाच सुरू आहे, तर त्यामुळे उन्हाळा लागल्यावर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पामधून होणारा अवैध उपसा थांबवण्याची गरज आहे. ज्यामुळे नागरीकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. आता वाशिमवासीयांचे वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शासनाने वाशिमवासीयांकरीता एकतर दुसऱ्या प्रकल्पातून पाणी व्यवस्था करावी नाहीतर नवीन प्रकल्प उभारण्यासाठी तसा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
तर मालेगावच्या सोनल प्रकल्पात अवघा १५.६६ टक्के जलसाठा शिललक आहे. त्यामुळे मालेगाववासीयांना तर पाण्यासाठी आतापासुन तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नल्यामुळे पाणी व्यथ जात आहे. एकीकडे वाशिम नगर परिषद पाणी वापरण्याच्या नागरिकांना सूचना करत आहेत. मात्र, याकडे लघु पाटबंधारे विभागचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जात आहे. या एकबुर्जी प्रकल्पात पाणी उपसल्या जात आहे. संबंधित विभागाकडून कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले.
या भयंकर परिस्थिकडे राज्य शासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. कारण, प्रशासन कामे करीत असले तरी आता उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे वाशिम व मालेगाव परीसरातील अवैध घेतलेल्या बोरवेल ज्या शासकीय जागेत आहेत, अशा बोरवेल ताब्यात घेऊन त्यातूनसुद्धा पाणीपुरवठा टँकरद्वारे शहरी व ग्रामीण भागात होऊ शकतो.
वाशिमचे जिल्हाधिकारी, योगश कुंभेजकर म्हणाले की, जिल्ह्यातील कुठल्याही प्रकल्पातील पाणीसाठी नागरिकांसाठी अधिग्रहीत आहे. त्याचा अवैध उपसा होऊन नये. यासाठी त्या त्या विभगाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.
Ans: एकबुर्जी प्रकल्पातून वाशिम शहराला पाणीपुरवठा होतो.
Ans: एकबुर्जी प्रकल्पात केवळ ३२ टक्के जलसाठा आहे.
Ans: मालेगावच्या सोनल प्रकल्पात १५.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.