Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: महावितरणची अभय योजना; वीजबिल थकबाकीवरील व्याज आणि दंड १०० टक्के माफ, ६१ हजार ग्राहकांना होणार लाभ

MSEDCL Abhay Yojana 2026-27 Washim: महावितरणने थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी 'अभय योजना २०२६-२७' जाहीर केली असून, वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार ३०७ ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 16, 2026 | 08:30 PM
MSEDCL Abhay Yojana 2026-27

MSEDCL Abhay Yojana 2026-27

Follow Us
Follow Us:
  • महावितरणची अभय योजना जाहीर
  • १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ
  • ६१ हजार ग्राहकांची ५८ कोटींची थकबाकी
वाशिम: महावितरणतर्फे कायमस्वरूपी तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्चदाब व लघुदाब ग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ ६१ हजार ३०७ थकबाकीदार ग्राहकांना घेता येणार आहे. ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची ही मोठी संधी असून, पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रेय बनसोडे यांनी केले. (Washim News)

Washim: वाशिम-मालेगावमध्ये पाणीटंचाईची भीती; सोनल प्रकल्पात केवळ १५.६६ टक्के जलसाठा, नवीन प्रकल्पाची मागणी जोरात

अभय योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले. या योजनेअंतर्गत ग्राहकांच्या एकूण थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे.

याशिवाय, उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यामध्ये आणखी २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच थकबाकी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाउन पेमेंट भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल, तर उच्चदाब ग्राहकांसाठी तीन ते सहा हप्त्यांची सुविधा उपलब्ध आहे.

तसेच, २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजपुरवठा पुनजोंडणीच्या वेळी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. अशा ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क आणि सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन

वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार ३०७ ग्राहकांकडे ५८ कोटी ४१ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना ८ कोटी २९ लाख रुपये व्याज आणि ७२ लाख ५२ हजार रुपये विलंब आकार माफ होणार आहे. ‘अभय योजना २०२६-२७ मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून किंवा मोबाइल अॅपद्वारे योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन व्याज व विलंब आकाराच्या मोठ्या आर्थिक सवलतीचा फायदा घ्यावा आणि थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : ऊसदराचा प्रश्न पेटला; २३ नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: महावितरणची अभय योजना कधीपर्यंत सुरू आहे?

    Ans: ही योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहे.

  • Que: वाशिम जिल्ह्यात किती ग्राहकांना योजनेचा लाभ मिळणार आहे?

    Ans: जिल्ह्यातील ६१ हजार ३०७ थकबाकीदार ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

  • Que: अभय योजनेत कोणती सूट मिळणार आहे?

    Ans: थकबाकीवरील १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे.

Web Title: Washim msedcl abhay yojana 2026 27 100 interest waiver electricity bill pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Light Bill
  • mahavitaran
  • Mahavitaran Department
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: वाशिम-मालेगावमध्ये पाणीटंचाईची भीती; सोनल प्रकल्पात केवळ १५.६६ टक्के जलसाठा, नवीन प्रकल्पाची मागणी जोरात
1

Washim: वाशिम-मालेगावमध्ये पाणीटंचाईची भीती; सोनल प्रकल्पात केवळ १५.६६ टक्के जलसाठा, नवीन प्रकल्पाची मागणी जोरात

Solapur News: थकबाकीदारांना महावितरणची दिवाळी भेट! व्याज, दंड १०० टक्के माफ; पंढरपूरचे ग्राहक होणार थकबाकीमुक्त
2

Solapur News: थकबाकीदारांना महावितरणची दिवाळी भेट! व्याज, दंड १०० टक्के माफ; पंढरपूरचे ग्राहक होणार थकबाकीमुक्त

Washim: जल जीवन मिशनचे काम रखडले! मेडशीकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
3

Washim: जल जीवन मिशनचे काम रखडले! मेडशीकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल
4

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.