Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित; ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत

Buldhana Drought Relief Financial Assistance: बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ४ लाख ३० हजार १५३ शेतकऱ्यांच्या खात्यांत प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे २१५ कोटींची अग्रीम मदत जमा करण्यात आली. दिवाळीपूर्वी मिळालेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 16, 2026 | 07:29 PM
Buldhana Drought Relief

Buldhana Drought Relief

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी सरकारची दिवाळी भेट
  • बुलढाण्यात ४.३० लाख खात्यांत अग्रीम मदत जमा
  • जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित
बुलढाणा: यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे होऊन नुकसान शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्ग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला.

शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करत दिवाळीपूर्वीच जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३० हजार १५३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत २१५ कोटी ८ लाख रुपयांची मदत्त जमा करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, चिखली तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ९६९ शेतकऱ्यांना २६ कोटी ४८ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याखालोखाल मेहकर तालुक्यातील ४७ हजार ७३२ शेतकऱ्यांना २३ कोटी ८७ लाख रुपये, सिंदखेड राजा तालुक्यातील ४२ हजार ७८ शेतकऱ्यांना २१ कोटी ४ लाख रुपये, खामगाव तालुक्यातील ४० हजार २६ शेतकऱ्यांना २० कोटी १ लाख रुपये, तर बुलढाणा तालुक्यातील ३६ हजार ३३ शेतकऱ्यांना १८ कोटी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वित्तरित करण्यात आले. तसेच लोणार

तालुक्यातील ३४ हजार ३८ शेतकऱ्यांना १७ कोटी २ लाख रुपये, मोताळा तालुक्यातील ३१ हजार ८१९ शेतकऱ्यांना १५ कोटी ९१ लाख रुपये, नांदुरा तालुक्यातील २७ हजार ३८८ शेतकऱ्यांना १३ कोटी ६९ लाख रुपये, तर संग्रामपूर तालुक्यातील २५ हजार ८५७ शेतकऱ्यांना १२ कोटी ९३ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील २४ हजार ७४८ शेतकऱ्यांना १२ कोटी ३७ लाख रुपये, मलकापूर तालुक्यातील २२ हजार ७५५ शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख रुपये, शेगाव तालुक्यातील २२ हजार ११७ शेतकऱ्यांना ११ कोटी ६ लाख रुपये, तर जळगाव जामोद तालुक्यातील २२ हजार ५९३ शेतकऱ्यांना ११ कोटी ३० लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली.

अडचणीच्या काळात ठरली उपयोगी

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील एकूण ४ लाख ३० हजार १५३ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत २१५ कोटी ८ लाख रुपयांची अग्रिम मदत जमा करण्यात आली. कमी पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने उपलब्ध करून दिलेली ही मदत शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात उपयोगी ठरली. दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम खात्यात जमा झाल्याने सणासुदीच्या खर्चासह दैनंदिन गरजा आणि शेतीशी संबंधित खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळाला.

Buldhana Accident: मलकापूर-बुलढाणा मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, पोलिसांत गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुलढाणा जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना मदत मिळाली?

    Ans: एकूण ४ लाख ३० हजार १५३ शेतकऱ्यांना मदत मिळाली.

  • Que: शासनाकडून किती आर्थिक मदत देण्यात आली?

    Ans: एकूण २१५ कोटी ८ लाख रुपयांची अग्रीम मदत वितरित करण्यात आली.

  • Que: प्रत्येक शेतकऱ्याला किती रुपये मिळाले?

    Ans: पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात आले.

Web Title: Buldhana drought relief 215 crore farmer financial assistance pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • buldhana news
  • Maharashtra Drought 2026
  • Makrand Patil

संबंधित बातम्या

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन
1

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ  १६ कारला धडक; अनेक जखमी
2

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ १६ कारला धडक; अनेक जखमी

Khamgaon: निराधार महिलांसाठी मोठा दिलासा! आता वयाच्या पुराव्यासाठी आधारकार्ड ग्राह्य; गणेश चौकसे यांच्या पाठपुराव्याला यश
3

Khamgaon: निराधार महिलांसाठी मोठा दिलासा! आता वयाच्या पुराव्यासाठी आधारकार्ड ग्राह्य; गणेश चौकसे यांच्या पाठपुराव्याला यश

Buldhana Accident: मलकापूर-बुलढाणा मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, पोलिसांत गुन्हा दाखल
4

Buldhana Accident: मलकापूर-बुलढाणा मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, पोलिसांत गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.