Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी परीक्षा; १ मार्च २०२६ रोजी आयोजन

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे इयत्ता ५ ते ८ वीतील विद्यार्थी पात्र असतील.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 27, 2025 | 06:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने देण्यात आली
  • अकोला येथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले
  • अर्ज ३० जानेवारी २०२६ पर्यंत सादर करणे बंधनकारक
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रवेश परीक्षा १ मार्च २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

बॉसने दिली लालसा, भावाने सोडली २६ लाखांची नोकरी… शेवटी हातात आला पश्चाताप!

अकोला प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी आणि ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस पात्र असतील.

अर्ज प्रक्रिया आणि मुदत

या प्रवेश परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांनी भरून घ्यावेत. भरलेले अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करणे आवश्यक आहे.
विहित नमुन्यातील अर्ज आदिवासी शासकीय/अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला येथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे भरलेले अर्ज ३० जानेवारी २०२६ पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यामध्ये

  • शाळेचा बोनाफाईड दाखला,
  • सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला,
  • पालकांचा किंवा विद्यार्थ्याचा जातीचा दाखला
    ही कागदपत्रे अनिवार्य आहेत. कागदपत्रांची पूर्तता नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षेची वेळ व केंद्रे

प्रवेश परीक्षा १ मार्च २०२६ रोजी होणार असून, इयत्तेनुसार परीक्षेची वेळ वेगवेगळी असणार आहे.
  • इयत्ता ६ वी साठी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होईल.
  • इयत्ता ७ वी ते ९ वी साठी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

मुंबईसह राज्यात पोलीस भरतीला अभूतपूर्व प्रतिसाद; १५,४०५ पदांसाठी तब्बल १६.५२ लाख अर्ज

या प्रवेश परीक्षेसाठी कोथळी येथील शासकीय आश्रमशाळा आणि घाटबोरी येथील शासकीय आश्रमशाळा ही परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. एकलव्य मॉडेल निवासी शाळा या गुणवत्ताधारित शिक्षणासाठी ओळखल्या जात असून, येथे विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण, निवासी सुविधा, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी दिल्या जातात. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही शाळा एक महत्त्वाची शैक्षणिक संधी ठरत आहे. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी पालक व विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Washim news entrance examination for admission to eklavya model residential school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
1

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा
2

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.