Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: महिला बचत गटाच्या वसुली त्वरित थांबवा, दुष्काळी परिस्थितीत कर्ज हप्त्यासाठी दबाव टाकू नये; तहसीलदारांना निवेदन

Karanja Mahila Bachat Gat financial crisis: कारंजा येथे दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बचत गटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्या व बँकांच्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले असून, सक्तीच्या कर्जवसुलीच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 21, 2026 | 07:12 PM
Representative image

Representative image

Follow Us
Follow Us:
  • कर्जाचे हप्ते भरणे कठीण
  • वसुलीचा दबाव मात्र कायम
  • कारंजातील महिलांची कर्जमाफीची मागणी
कारंजा: दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकांच्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी महिलांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने वंचित बहुजन आघाडीने महिलांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली.सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबावणे गरजेचे आहे.

Buldhana: पशुधनाच्या चारापाण्याचे योग्य नियोजन तत्काळ करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले निर्देश

कारण, सर्वत्र दुष्काळ पसरला असून, शेतकरी शेतमजूर सर्व आतचणीत आहेत काम नसल्यामुळे त्यांना उपासमारीची वेळ आली. असे असताना मायक्रो फायन्स कंपनी, महिला बचत गटातील कर्ज तसेच ग्रामसंघातून घेतलेले कर्ज भरणे शक्य नाही. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव उस्मान भाई गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित महिलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांना धीर देत त्यांना सरकारकडून न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दुष्काळी परिस्थितीचा विचार करून महिलांना कर्जहप्त्यांबाबत दिलासा द्यावा. तसेच कर्जवसुलीच्या नावाखाली होणारा कथित दबाव व त्रास थांबवावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्राम मुरंबी येथील महिला बचत गटाच्या महिलासह उस्मान गारवे, सुजित भगत, शेषराव मेश्राम, देवराव कटके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सक्तीची कर्जवसुली थांबविणे अत्यावश्यक

शिवाय महिला या ग्रामीण भागातील असल्याने त्या अशा बँकच्या कर्मचाऱ्यांना भिऊन आपल्याकडील वस्तू विकण्यापर्यंत बँकेचे पैसे देत आहेत. परंतु, त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण बिघडले. त्याच्यावर प्रचंड आर्थिक ताण आल्यामुळे सक्तीची कर्जवसुली थांबविणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ग्राम मुरंबी येथील महिलांबचत गटाच्या सर्व महिलांनी एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन देऊन कर्जमाफीची मागणी केली.

कारंजात २६० टन सोयाबीन कुटार जप्त

संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैध साठवणूक, वाहतूक व हस्तांतरण रोखण्यासाठी कारंजा तालु‌का भरारी पथकाने धडक कारवाई केली. कारंजा शहरातील अलीनगर व एकतानगर परिसरातून २६० टन सोयाबीन कुटार जप्त करण्यात आले. तसेच तालुक्यातील १० गट्ट कारखान्यांची तपासणी करून उत्पादन बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा

Web Title: Washim karanja mahila bachat gat karj vasul halt to loan recovery amid drought pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Karanja City
  • Maharashtra Drought 2026
  • Washim news

संबंधित बातम्या

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
1

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

Pune Drought: पुणे जिल्ह्यात दसऱ्यावर दुष्काळाचे सावट! १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त
2

Pune Drought: पुणे जिल्ह्यात दसऱ्यावर दुष्काळाचे सावट! १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश
3

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा
4

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.