Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: महावितरणने घेतली दखल, दापुरीत जळालेल्या विद्युत डीपी बसविण्याचे काम सुरू; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

Washim Risod Burnt Transformer Replacement: रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द शिवारात तीन विद्युत डीपी जळाल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. दैनिक नवराष्ट्रमध्ये बातमी प्रसिद्ध होताच महावितरणने दखल घेत गुरुवारी दोन नवीन डीपी बसविण्यास सुरुवात केली, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 17, 2026 | 07:44 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • दापुरीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
  • विद्युत डीपी बसविण्याची प्रक्रिया सुरू
  • वीजपुरवठा सुरळीत होण्याची आशा

रिसोड: तालुक्यातील दापुरी खुर्द शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास आग लागून ३ विद्युत डीपी जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येकडे लक्ष वेधणारी बातमी दैनिक नवराष्ट्रमध्ये मंगळवारी प्रकाशित होताच महावितरण ताफा घटनास्थळी दाखल होऊन जळालेल्या ट्रान्सफार्मरची पाहणी करून प्रशासनाने दखल घेतली.

Buldhana: दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन; १० हजारांहून अधिक कामांचे नियोजन

गुरुवारी जळालेल्या ३ डीपोंपैकी २ नवीन डीपी बसविण्यात महावितरण सुरुवात केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दापुरी खुर्द शिवारातील अनेक शेतकरी विहिरी आणि बोरवेलच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्यासाठी या विद्युत डीपींवर अवलंबून आहेत. मात्र, ३ डीपी जळाल्यामुळे रब्वी हंगामातील गहू, हळद, तूर, चिया, भाजीपाला यासह अन्य पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला होता. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. शेतकऱ्यांची ही समस्या दैनिक नवराष्ट्राने लावून धरल्याने महावितरण प्रशासनाला जाग आली.

दोन डीपींचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला

उर्वरित तिसरी डीपी तातडीने बसविण्याची मागणी होत आहे. तीनपैकी २ विद्युत डीपी बसविण्यात आल्या असल्यातरी अद्याप एका डीपीचे काम बाकी आहे. त्यामुळे उर्वरित तिसरी डीपीदेखील लवकरात लवकर बसवून वीजपुरवठ्याची समस्या पूर्णपणे दूर करावी, अशी अपेक्षा दापुरी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. रब्बी हंगामातील पिकांना वेळेवर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असल्याने महावितरणने उर्वरित डीपी बसविण्याच्या कामालाही प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

Web Title: Washim risod dapuri khurd burnt transformer replacement navarashtra impact pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • Risod Taluka
  • Washim news

संबंधित बातम्या

Cricket: कोंडाळा महालीच्या मुलींची बाजी, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड
1

Cricket: कोंडाळा महालीच्या मुलींची बाजी, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा
2

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा
3

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात
4

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.