
District Collector Yogesh Kumbhejkar
यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, रोहयो उपजिल्हाधिकारी वीरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावणे, सहाय्यक वनसंरक्षक मंतावार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गायरान, गाळपेर व वैयक्तिक जमिनीवर चारा लागवड चारा उपलब्धता वाढविण्यासाठी अतिक्रमणमुक्त गायरान जमीन, धरण व तलाव परिसरातील गाळपेर जमीन तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांच्या जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्ती, महिला-प्रधान कुटुंबे आणि पशुपालक कुटुंबांना प्राधान्य द्यावे.
पशुसंवर्धन व कृषी विभागाने अद्ययावत पशुगणनेच्या आधारे मोठ्या व लहान जनावरांची संख्या विचारात घेऊन दररोज आणि दरमहा आवश्यक असलेल्या चाऱ्याचे प्रमाण निश्चित करावे. खरीप व रब्बी हंगामातील पीकनिहाय क्षेत्राच्या आधारे कडबा, कुटार आणि भुसा यांसारख्या वैरणीची उपलब्धता मोजून चारा ताळेबंद तयार करावा. त्यानुसार संभाव्य चारा टंचाईप्रवण गावांची यादी तातडीने अंतिम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
चारा लागवडीचे नियोजन मंगळवारपर्यंत पूर्ण करावे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवडीची ठिकाणे २५ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करावीत, वैरण बियाणे व गवताच्या ठोंब्यांची उपलब्धता ३० ऑक्टोबरपर्यंत निश्चित करावी. ग्रामसभेचे ठराव घेऊन कामांचा ग्रामपंचायत विकास आराखड्यात समावेश करणे आणि युक्तधारा प्रणालीवर नोंदणी करण्याची कार्यवाही ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देश दिले.