Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही रेकॉर्डिंग अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक पेपरपूर्वी ३० मिनिटे आणि परीक्षा संपल्यानंतरही रेकॉर्डिंग सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2026 | 06:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळाने कडक नियमावली लागू केली आहे. याअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आणि त्याचे रेकॉर्डिंग जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात विभागीय मंडळाने क्षेत्रीय अधिकारी, केंद्रसंचालक, मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

इलेक्शन कमिशनमध्ये भरती! पदवी असेल तर उत्तर पगार मिळेल; पात्र असाल तर अर्ज करा

निर्देशानुसार, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होमंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देशण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सुरू ठेवणे आवश्यक आहे. तसेच सर्व कॅमेरे सातत्यपूर्ण (continuous) रेकॉर्डिंग मोडवरच ठेवावेत आणि मोशन रेकॉर्डिंग टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रातील सर्व वर्गखोल्या, परिसर तसेच संगणक प्रयोगशाळांमध्ये कॅमेरे कार्यरत असणे अनिवार्य आहे.

रेकॉर्ड केलेले फुटेज पेन ड्राइव्ह, संगणक, हार्ड डिस्क किंवा क्लाउड स्टोरेजवर सुरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यासही रेकॉर्डिंग सुरू राहावे यासाठी सीसीटीव्ही प्रणाली यूपीएस किंवा इन्व्हर्टरशी जोडणे बंधनकारक आहे. यासाठी किमान दोन तासांचा बॅकअप उपलब्ध असावा, असेही सांगण्यात आले आहे. तांत्रिक कामांसाठी आयटी शिक्षकांची मदत घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

परीक्षेदरम्यान तणावाचे वातावरण! आढळली कॉपी तर अनेक विद्यार्थ्यांसाठी जागेचा अभाव

या नियमांचे पालन न झाल्यास संबंधित प्राचार्य, केंद्रसंचालक किंवा कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार असून, ‘महाराष्ट्र गैरमार्ग प्रतिबंध अधिनियम १९८२’ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. परीक्षा केंद्रांवर भेट देणारी भरारी आणि बैठे पथके सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असल्याची खात्री करून अहवाल सादर करणार आहेत. याशिवाय, जिल्हा दक्षता समिती किंवा मंडळाने मागणी केल्यास सीसीटीव्हीचे लाईव्ह एक्सेस देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. कॅमेरे बंद ठेवणे, फुटेज न देणे किंवा एक्सेस नाकारणे हे गैरप्रकार लपवण्याचा प्रयत्न मानला जाईल. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ‘सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याखाली’ ठेवून गैरप्रकारांना आळा घालण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Washim news preserve cctv footage of the exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
2

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती
3

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा
4

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.