फोटो सौजन्य - Social Media
पदवीधर उमेदवारांसाठी चांगली नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय निवडणूक आयोग (ECI) साठी डेटा एंट्री ऑपरेटर पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) मार्फत केली जात आहे. इच्छुक उमेदवार www.becil.com या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन पाहू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2026 आहे. त्यामुळे वेळीच सतर्क रहा.
ज्या उमेदवारांना संगणकावर काम करण्याची आवड आहे आणि प्रतिष्ठित संस्थेत करिअर घडवायचे आहे, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करताना निवडणूक आयोगात काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे हे काम प्रतिष्ठेचे असणार आहे.
पात्रता आणि अटी
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यासोबत संगणकाचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. MS Excel वर काम करण्याचा अनुभव असावा. इंग्रजी टायपिंग किमान 35 शब्द प्रति मिनिट वेगाने येणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.
भरतीची महत्त्वाची माहिती
या भरतीअंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदासाठी एकूण 10 जागा उपलब्ध आहेत. ही नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्टिंगनंतर इंटरव्ह्यू, स्किल टेस्ट किंवा असेसमेंट घेतले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹24,356 इतका पगार मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. सर्वप्रथम अधिकृत नोटिफिकेशनमधील अर्जाचा फॉर्म प्रिंट करून घ्यावा. त्यामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, शैक्षणिक माहिती आणि कामाचा अनुभव इत्यादी सर्व माहिती अचूक भरावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती जोडाव्यात. पूर्ण अर्ज ‘BECIL भवन, C-56/A-17, सेक्टर-62, नोएडा-201307, उत्तर प्रदेश’ या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करताना सर्वसाधारण उमेदवारांना ₹295 अर्ज फी डिमांड ड्राफ्टद्वारे भरावी लागेल, तर SC/ST/PWD उमेदवारांना फी माफ आहे. ही संधी दवडू नका. वेळेत अर्ज करून तुमचे करिअर एका प्रतिष्ठित संस्थेत सुरू करा!






