फोटो सौैजन्य - Social Media
United States Navy SEALs मध्ये भारतीय तरुण जरी इच्छुक नसले तरी USA चे अनेक धाडसी तरुण भरती होऊ इच्छुक असतात. मुळात, भारतीय मूळ असलेले अनेक लोकं USA सारख्या देशांमध्ये तेथील Citizenship घेऊन वास्तव्य करत आहेत, त्यामुळे United States Navy SEALs मध्ये अनेक भारतीय हमखास आढळून येतील. पण तुम्हाला माहिती आहे का? SEAL होणे किती कधी असतं ते? चला तर मग जाणून घेऊयात, असा आठ्वड्याबद्दल जे SEAL होण्यासाठी पात्र करणे गरजेचे असते. मुळात, SEAL होण्यासाठी घेण्यात येणारे प्रशिक्षण हे जगातील सगळ्यात कठीण प्रशिक्षणापैकी एक आहे. कारण यामध्ये सहभाग घेणारे ८०% तरुण तर माघार घेतातच. का? चला तर मग पाहुयात.
SEAL होणे USA मध्ये राहणाऱ्या अनेक धाडसी वीरांचे स्वप्न असते. वीर का? कारण SEAL होण्यासाठी ‘Hell वीक’ नावाचा एक आठवडा पार करावा लागतो. उमेदवाराला ५.५ दिवस एका Torture चा सामना करावा लागतो. Hell Week हे BUD/S (Basic Underwater Demolition/SEAL) प्रशिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये भाग घेणारया सैनिकांना या आठवड्यातून फक्त ४ ते ५ तासांची झोप मिळते. हे प्रशिक्षण उमेदवाराचे मानसिक किंवा शारीरिक छळ करण्यासाठी नव्हे तर त्या छळापासून स्वतःचे बचाव करण्यासाठी आणि त्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक सराव म्हणून दिले जाते. या प्रशिक्षणाला दिलेल्या मुदतीपर्यंत टिकून राहून जो पात्र करतो त्याला SEAL म्हणून नियुक्त केले जाते.
‘Hell Week’ या भरती प्रक्रियेमध्ये रेताड समुद्रकिनाऱ्यावर सतत धावणे, झोप न मिळणे आणि बर्फासारख्या थंड पाण्यात तासन्तास राहणे. थंडीने कुडकुडणाऱ्या समुद्राच्या लाटांमध्ये पाठ केल्यावर तासन्तास पडून राहणे100 किलो वजनाच्या ओंडक्याला घेऊन जिम करणे, लाकडी बोट डोक्यावर घेऊन मैलोनमैल धावणे, पाण्यात मिशन्स पूर्ण करणे तसेच झोपेचा अभाव आणि थकवा असूनही विविध रणनीती, नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन चाचण्या घेतल्या देणे अशा मोहिमांना पात्र करावे लागते. काही जण हार मानतात तर काही SEAL होतात.