फोटो सौैजन्य - Social Media
RAW देशाची सगळ्यात गुप्त असणाऱ्या यंत्रणांमधील एक आहे. ही यंत्रणा विदेशी सुरक्षा हालचालींवर नियंत्रण ठेवते. RAW च्या नियंत्रणाखाली असणाऱ्या सगळ्या मोहिमा अगदी गुप्त स्वरूपात असतात. RAW मध्ये करण्यात येणारे प्रत्येक कार्य अगदी गुप्त असते. महत्वाचे म्हणजे RAW मध्ये एजेंट पदी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांची भरती ही अगदी गुपित पद्धतीने केली जाते. मुळात, RAW च्या भरतीसाठी कोणत्याही संकेतस्थळावर जाऊन अर्जाचा फॉर्म भरण्याची गरज नसते. मुळात, ही भरती साधारण तरुणांसाठी नसतेच. या भरतीमध्ये नियुक्तसाठी विविध निकष पात्र करावे लागतात. हे निकष अतिशय कठीण आहेत, कारण याला पात्र शक्यतो एखादा सरकारी अधिकारीच करतो.
RAW जास्तीत जास्त IAS, IPS तसेच भारतीय सैन्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांना भरती कारण्यात्त भर देतो. आधीपासून देशाच्या केंद्रीय व्यवस्थेत रुजू असणारे अनुभवी अधिकारी RAW चे भाग बनतात. तर बहुतेकवेळा UPSC क्रॅक करणारे उमेदवारांना IB किंवा इतर व्यवस्थेच्या माध्यमातून RAW मध्ये भरती केली जाते. मुळात, ही प्रक्रिया देखील अतिशय गुप्त पद्धतीने आयोजली जाते. तसेच भारतीय सैन्यातील अनुभवी अधिकाऱ्यांनादेखील RAW मध्ये भरती केली जाते.
या भरतीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना RAW ची ट्रेनिंग दिली जाते आणि नंतर एका गुप्त मोहिमेवर पाठवण्यात येतं. या ट्रेनिंगमध्ये हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण, भाषा तसेच संवादाचे कौशल्य, शारीरिक स्वास्थ्य तसेच मनावर नियंत्रण ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर सायबर सिक्योरिटीबद्दल शिकवले जाते. या प्रशिक्षणानंतरच एखादा अधिकारी RAW मध्ये एजंट बनण्याचा पात्र होतो.
RAW ची भरती प्रक्रिया इतकी कणखर असते की ज्या अधिकाऱ्याची निवड केली जाते, त्या अधिकाऱ्याच्या घराची, कुटुंबाशी, मित्रांशी तर फक्त इतकेच नव्हे तर त्या अधिकाऱ्याच्या मढविद्यालयीन प्राचार्यांशी देखील त्या अधिकार्यांच्या संपूर्ण चरित्राबद्दल चर्चा केली जाते. त्या अधिकारीमध्ये खरंच देश प्रेम आहे का? या सर्व बाबी तपासल्या जातात, मगच त्या अधिकाऱ्याला RAW मध्ये एजेंट म्हणून घेण्याचा निर्णय घेतला जातो.