Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Young Innovators India: COP26 गाजवणारी १५ वर्षांची विनिषा उमाशंकर कोण आहे? तिच्या ‘सोलर इस्त्री गाडी’ने जगाला कसं थक्क केलं?

Vinisha Umashankar Young Innovators India: १५ वर्षीय विनिषा उमाशंकरने शोधलेली 'सोलर इस्त्री गाडी' काय आहे? जाणून घ्या कोळशाच्या प्रदूषणावर तिने शोधलेला अनोखा उपाय आणि COP26 परिषदेतील तिचे गाजलेले भाषण.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 02, 2026 | 10:26 AM
solar

solar

Follow Us
Follow Us:

Vinisha Umashankar Young Innovators India: हवामान बदलावरील चर्चेत सहसा जगातील मोठे नेते, सरकारे आणि कार्बन उत्सर्जनाची उद्दिष्टेच जास्त प्रकाशझोतात असतात. परंतु, २०२१ मध्ये ग्लासगो येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेत (COP26) एका भारतीय शाळकरी मुलीने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तामिळनाडूच्या विनिशा उमाशंकर हिने तिच्या अनोख्या इनोव्हेशनने अनेकांना प्रभावित केले आहे.

विनिशा उमाशंकर ही तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील राहणारी आहे. ती जेव्हा १० वीत शिकत होती, तेव्हा तिने रस्त्याच्या कडेला इस्त्रीचे काम करणाऱ्या लोकांच्या जगण्यातील एक मोठी समस्या पाहिली. पारंपारिक कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीच्या गाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघायचा. यामुळे इंधनाचा वापर तर वाढायचाच, शिवाय तासनतास काम करणाऱ्या मजुरांना उष्णता आणि प्रदूषण या दोन्हीचा त्रास सहन करावा लागायचा. याच समस्येने तिला यावर एक नवीन उपाय शोधण्यासाठी प्रेरित केले.

काय होती तिची अनोखी कल्पना?

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी विनिशाने सौर ऊर्जेवर (Solar Energy) चालणारी मोबाईल इस्त्री गाडी तयार करण्याची संकल्पना मांडली. या गाडीवर सोलर पॅनेल लावून त्याद्वारे निर्माण होणाऱ्या विजेवर स्टीम आयरन (इस्त्री) चालवण्याची ही योजना होती. कोळशावरील अवलंबित्व कमी करणे, प्रदूषण थांबवणे आणि रस्त्याकाठच्या इस्त्री चालकांना सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. पर्यावरण संवर्धन आणि रोजगार या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून ही कल्पना तयार करण्यात आली होती.

Doctors Burnout: रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर स्वतःच तणावात?पांढऱ्या कोटामागील धक्कादायक वास्तव एकदा वाचाच

 कल्पनेला प्रत्यक्ष रूप कसे मिळाले?

विनिशाच्या या कल्पनेला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय नवसंशोधन प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले. वर्ष २०१९ मध्ये तिच्या संकल्पनेवर आधारित ‘सोलर इस्त्री गाडी’चा एक वर्किंग प्रोटोटाइप तयार करण्यात आला. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे, ऊन नसतानाही ही गाडी बॅटरी, नेहमीची वीज किंवा जनरेटरच्या मदतीने सहज चालवता येऊ शकते.

कोणते सन्मान मिळाले?

विनिशाच्या या संशोधनाचे कौतुक केवळ भारतातच नाही, तर परदेशातही झाले. तिला प्रतिष्ठेच्या ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाईट (IGNITE) पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त, २०२१ मध्ये ‘अर्थ डे नेटवर्क’ने तिला ‘रायझिंग स्टार’ म्हणून निवडले.

Google सोडून सुरू केला स्टार्टअप! अब्जावधींच्या एआय क्षेत्रात युसूफ इम्रान यांनी कशी मारली बाजी?

COP26 परिषदेत काय म्हणाली होती?

वर्ष २०२१ मध्ये ग्लासगो येथे आयोजित COP26 परिषदेत विनिशाने जगातील दिग्गज नेते आणि प्रतिनिधींसमोर भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने आपल्या भाषणात अक्षय ऊर्जा (Renewable Energy) आणि हवामान बदलावर तातडीने उपाययोजना करण्याच्या गरजेवर भर दिला. तिच्या भाषणातील सर्वात गाजलेले वाक्य म्हणजे “मी येथे भविष्याबद्दल बोलायला आलेली नाही, तर मीच भविष्य आहे.” तिच्या या एका वाक्याने जगभरातील लोकांना तरुण पिढीची ताकद आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

Web Title: Who is vinisha umashankar solar ironing cart innovation young innovators india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • solar energy
  • Solar Project

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.