Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WHT NOW आणि HSNC विद्यापीठाची भागीदारी; विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा उपक्रम

सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी WHT NOW संस्थेने HSNC विद्यापीठासोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविरोधात सजग आणि सक्षम बनवले जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 13, 2025 | 04:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, तरुणांना डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे. याच उद्देशाने, स्वयंसेवी संस्था WHT NOW ने मुंबईतील नामांकित HSNC विद्यापीठासोबत भागीदारी केली आहे. या सहकार्याचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, सेक्स्टॉर्शन, सायबर बुलिंग, ओळख चोरी यांसारख्या गंभीर विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भारतीय वायु दलात अधिकारी बनायचं आहे? जाणून घ्या भरतीविषयी संपूर्ण माहिती

हा उपक्रम WHT NOW च्या नॅशनल यूथ अ‍ॅम्बेसेडर प्रोग्रॅमचा भाग असून, संस्थेचे उद्दिष्ट २०२५ अखेरपर्यंत देशभरातील ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे आहे. HSNC विद्यापीठ हा या उपक्रमाचा पहिला भागीदार असून, या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर फर्स्ट रिस्पॉन्डर्स म्हणून घडवण्यात येणार आहे. हे विद्यार्थी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर इतरांना मदत करण्यासाठीही सक्षम असतील. या प्रशिक्षणात सायबर सुरक्षा तज्ज्ञ, कायदेविषयक सल्लागार व मानसिक आरोग्य विशेषज्ञांचा समावेश असलेली सत्रं आयोजित केली जातील. यात सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यांचे भावनिक परिणाम, कायदेशीर उपाय व योग्य प्रतिसाद यांची माहिती दिली जाईल.

WHT NOW च्या संस्थापक नीती गोयल यांनी सांगितले की, “आम्ही HSNC विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार नुकताच पूर्ण केला असून, लवकरच कार्यक्रम सुरू होईल. ही भागीदारी विद्यार्थ्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी निर्णायक ठरेल.” सह-संस्थापक अक्षत खेतान म्हणाले, “सायबर गुन्हे कॅन्सरप्रमाणे गुपचूप वाढतात. कायदेशीर उपाय उपलब्ध असले तरी ते वेळखाऊ आणि खर्चिक असतात. त्यामुळे सजगता आणि वेळेवर कारवाई महत्त्वाची आहे.” ते पुढे म्हणाले, “आमचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सायबर सुरक्षेचा दूत बनवण्याचा आहे.”

CBSE Result 2025: सीबीएसई बोर्ड बारावीच्या परिक्षेत मुलींची बाजी, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “ही भागीदारी केवळ शैक्षणिक नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या डिजिटल, मानसिक आणि सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.” सायबर छळ व फसवणूक प्रकरणांसाठी WHT NOW ने राष्ट्रीय हेल्पलाइन (+91-9019115115) सुरू केली असून, आतापर्यंत ४० हून अधिक संस्थांनी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: Wht now and hsnc university partner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • Career News
  • education news

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका
2

Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका

Central Secretariat Library: ८.५ लाख पुस्तके धोक्यात! देशातील सर्वात जुनी लायब्ररी ‘या’ प्रोजेक्टमुळे हलवली जाणार!
3

Central Secretariat Library: ८.५ लाख पुस्तके धोक्यात! देशातील सर्वात जुनी लायब्ररी ‘या’ प्रोजेक्टमुळे हलवली जाणार!

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
4

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.