Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP School : ग्रामीण शिक्षणाला मिळणार आता नवी दिशा; STEM Lab म्हणजे काय रे भाऊ ?

ग्रामीण शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास घडवत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथे अत्याधुनिक स्टेम इनोव्हेशन अँड लर्निंग सेंटर (स्टेम लॅब) सुरू करण्यात आले आहे. पण हे स्टेम लॅब नक्की आहे तरी काय ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 04, 2026 | 02:38 PM
ZP School : ग्रामीण शिक्षणाला मिळणार आता नवी दिशा; STEM Lab म्हणजे काय रे भाऊ ?
Follow Us
Follow Us:
  • ग्रामीण शिक्षणाला मिळणार आता नवी दिशा;
  • STEM Lab म्हणजे काय रे भाऊ ?
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास घडवत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथे अत्याधुनिक स्टेम इनोव्हेशन अँड लर्निंग सेंटर (स्टेम लॅब) सुरू करण्यात आले आहे. अटलाशियन फाउंडेशन आणि अमेरिकन इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल इविवलायझर कार्यक्रमांतर्गत है केंद्र संभाजीनगर शहरातील पदमपुरा येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतून ढोरेगाव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे ढोरेगावसह परिसरातील जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी ढोरेगाव शाळेत स्थलांतरित होणाऱ्या स्टेम लॅब संदर्भातील अधिकृत पत्र निर्गमित केले आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावची उल्लेखनीय कामगिरी या निमित्ताने पुन्हा समोर आली असून या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या क्षेत्रातील आधुनिक शिक्षणाच्या उपलब्ध मोठ्या संधीसह प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. शाळेची सतत प्रगतीशील व गुणवत्तापूर्ण वाटचाल, ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या, स्टेम लॅबसाठी आवश्यक असलेली स्वतंत्र जागा, शाळा केंद्रस्थानी असल्याने इतर शाळांनाही लाभ होईल.

पण हे स्टेम लॅब आहे तरी काय ?

स्टेम लॅब (STEM Lab) म्हणजे अशी प्रयोगशाळा जिथे विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचा एकत्रितपणे आणि प्रत्यक्ष कृतीतून अभ्यास करतात. ‘STEM’ या शब्दाचा अर्थ असा की,
S – Science (विज्ञान)

T – Technology (तंत्रज्ञान)

E – Engineering (अभियांत्रिकी)

M – Mathematics (गणित)

प्रात्यक्षिक शिक्षण: येथे पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रयोगांवर जास्त भर दिला जातो. विद्यार्थी स्वतः मॉडेल्स किंवा रोबोट्स बनवून संकल्पना समजून घेतात.

आधुनिक उपकरणं: स्टेम लॅबमध्ये सामान्यत 3 डी प्रिंटर्स, रोबोटिक्स किट्स, सेन्सर्स, कोडिंग सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्सची साधने उपलब्ध असतात.

समस्या निवारण (Problem Solving): विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्या दिल्या जातात आणि त्या सोडवण्यासाठी त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करुन तुम्ही ते कसं सोडवू शकाल याबाबत टास्क दिला जातो. क्रिएटीव्हीबाबत ही लॅब विद्यार्थ्यांना नवीन शोध लावण्यास आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यास मदत करते.

स्टेम लॅबचा फायदा काय ?
या STEM Lab मध्ये रोबोटिक्स, कोडिंग, एक्सपेरिमेंटल सायन्स आणि २१व्या शतकातील जीवन कौशल्यांवर आधारित उपक्रम राबवले जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे शिकण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते.

स्टेम लॅब (STEM Lab) मध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया ही तुम्ही कोणत्या स्तरावर (शाळा, कॉलेज किंवा खाजगी संस्था) प्रवेश घेऊ इच्छिता यावर अवलंबून असते. याचे मुख्य दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

शालेय स्तरावर (In-School STEM Labs)
आजकाल अनेक शाळांनी स्वतःची ‘अटल टिंकरिंग लॅब’ (Atal Tinkering Lab) किंवा स्टेम लॅब सुरू केली आहे.

प्रक्रिया: जर तुमच्या शाळेत अशी लॅब असेल, तर तुम्हाला वेगळा प्रवेश घेण्याची गरज नसते. विज्ञान किंवा तंत्रज्ञान विषयाच्या तासाला किंवा ‘लॅब सेशन’ दरम्यान विद्यार्थ्यांना तिथे नेले जाते.

Fresher साठी आनंदाची बातमी! विमानतळावर काम करण्याची संधी, अर्ज प्रक्रिया आणि पगाराच्या तपशिलांबद्दल जाणून घ्या

स्टेम प्रशिक्षण केंद्रात प्रवेशिका कशी घ्यावी ?
अनेक शाळा स्टेम प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण या व्यतिरिक्त देखील अनेक खाजगी संस्था किंवा कोडिंग क्लासेस स्वतःची स्टेम लॅब चालवतात.

  • तुमच्या परिसरातील मान्यताप्राप्त स्टेम सेंटरला भेट देऊन उपलब्ध कोर्सेसची (उदा. रोबोटिक्स, एआय, कोडिंग) माहिती घ्या.
  • साधारणपणे 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे स्तर असतात. त्या त्या  वयोगटानुसार कोर्स निवडावा लागतो.
  • काही मोठ्या संस्था विद्यार्थ्यांची आवड आणि तांत्रिक कल तपासण्यासाठी छोटी चाचणी घेऊ शकतात.
  • कोर्सच्या कालावधीनुसार फी भरावी लागते.
स्टेम क्षेत्रात करिअरसाठी प्रवेश (Higher Education)
जर तुम्हाला स्टेम विषयांत पदवी (Degree) घ्यायची असेल, 10 वी आणि 12वी मध्ये विज्ञान (Physics, Chemistry) आणि गणित (Maths) विषय असणे अनिवार्य आहे.

प्रवेश परीक्षा:
भारतात अभियांत्रिकी (Engineering) साठी JEE Main, MHT-CET किंवा विज्ञानातील संशोधनासाठी IISER/NEST सारख्या परीक्षा द्याव्या लागतात.

कौशल्य विकास:
केवळ पदवी पुरेशी नसते, तर प्रत्यक्ष प्रयोगांची आवड असणे महत्त्वाचे असते.  थोडक्यात काय तर डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विज्ञानात एक नवी पिढी घडवण्यासाठी ही कार्यशाळा काम करतात.

शिक्षक भरती प्रक्रियेत गुणांकन पद्धतीत सुधारणा! नेमक्या कोणत्या उद्देशाने करण्यात आले बदल

Web Title: Zp school rural education will now get a new direction what is stem lab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • education news
  • Sambhajinagar News
  • ZP School

संबंधित बातम्या

Success Story: पतियाळाच्या नूर सिंगलाने रचला इतिहास, CA फायनल परिक्षेत देशभरातून पटकावला पहिला क्रमांक
1

Success Story: पतियाळाच्या नूर सिंगलाने रचला इतिहास, CA फायनल परिक्षेत देशभरातून पटकावला पहिला क्रमांक

NEET UG Re Exam पूर्वी अलर्ट, जुन्या Admit Card वरून मिळणार नाही प्रवेश, NTA रिमाइंडरमध्ये नक्की काय?
2

NEET UG Re Exam पूर्वी अलर्ट, जुन्या Admit Card वरून मिळणार नाही प्रवेश, NTA रिमाइंडरमध्ये नक्की काय?

प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीची लिंक सुरू करावी; शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात यांची मागणी
3

प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीची लिंक सुरू करावी; शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात यांची मागणी

SSC Topper Maharashtra : १०० टक्के गुण, राज्यात प्रथम क्रमांक; तरीही श्रेयस तांबे राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रतीक्षेत
4

SSC Topper Maharashtra : १०० टक्के गुण, राज्यात प्रथम क्रमांक; तरीही श्रेयस तांबे राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.