
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सध्या सर्रासपणे ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये भयंकर घटना घडली आहे. ए आयच्या माध्यमातून ३ बहिणीचे न्यूड फोटो आणि वीडियो बनवले आणि ते त्याच्या नंबरवर पाठवून दिले. १९ वर्षीय तरुणाला आपले आणि बहिणीचे असे फोटो पाहून धक्का बसला आणि त्याने नैराश्यात स्वतःच जीवन संपवल आहे. फरिदाबाद इथे ही घटना घडली आहे. घरात विषारी गोळ्या खावून त्याने स्वतः ला संपवून घेतल. साहिल नावाच्या व्यक्तीने त्याच्या सोबत चैट केली आणि ते चैट करत न्यूड फोटो हे एआयच्या माध्यमातून बनवत त्याने पैशाची मागणी ही केली होती.
Ambernath Crime: मोबाईल चोरांना अंबरनाथ पोलिसांचा दणका ! ४५ पेक्षा जास्त मोबाईल केले हस्तगत
पैसे दे अन्यथा व्हायरल करेन !
साहिल नावाच्या व्यक्तीने पैशाची मागणी केली होती. राहुलने या मागणीबाबत कुठे ही वाचता केली नाही. राहुल ने आपल्या बहिणीचे आणि आपले न्यूड फोटो पाहिले होते. त्याला कल्पना नव्हती की यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी एआयचा वापर करून असे फोटो बनवले आहेत. मात्र स्वतःची आणि बहिणीचे इज्जत बाहेर जाऊ नये यासाठी स्वतःला संपवत त्याने आत्महत्या केली. या प्रकरणात दोन जणांविरुद्ध फरीदाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एआय तुमचा आयुष्य उध्वस्त करू शकतो ?
आजच्या एआयच्या जमान्यात काही नाही ते शक्य झाल आहे. याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो आणि सध्या त्याचा दुरुपयोग होत असल्याच्या घटना आपण पाहत आहोत. एआयच्या माध्यमातून न्यूड फोटो किवा वीडियो बनवणे असेल त्या माध्यमातून पैशाची मागणी केली जाते आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. मात्र घाबरून ना जात जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार द्या अन्यथा तुम्ही ही अशा घटनेचे शिकार ठरू शकता. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करा.
राहुलला मागितले २० हजार
राहुलकडे साहिल याने २० हजर रुपयांची मागणी केली होती. मात्र ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून त्याने ते व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी दिल्याने राहुल नैराश्यात गेला होता. तो १५ दिवसापासून अस्वस्थ वाटला आणि त्याने बंद खोलीत गोळी खावून आयुष्य संपवून घेतल.
Jalgao Crime: जळगावात दुर्दैवी अपघात; रुळ ओलांडताना दोन तरुणांचा मृत्यू, नात्याने मामा–भाचे