अंबरनाथ : मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. चांगला मोबाईल असावा हे प्रत्येकाची एक गरज आणि स्वप्न झाल आहे. मात्र महागडे मोबाईल चोरून विकणाऱ्यांची एक मोठी साखळी निर्माण झाली आहे. अंबरनाथमध्ये ४५ पेक्षा जास्त मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी या पोलिस स्टेशन ला आल्या होत्या. त्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला आणि मोबाईल चोरांना अटक केली आहे. दिवाळीच्या काळात या मोबाईल चोरांचा सुळसुळाट होता त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरांनी मोबाईल चोरले होते. मात्र आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Pune Crime: पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; कोंढव्यातून संशयित दहशतवाद्याला अटक
मोबाईल हरवला तर काय कराल ?
अंबरनाथ पोलिसांनी काय केला ?
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी चोरांना बेड्या ठोकल्या आहेत , मोबाईल नंबर वरून टॅकिंग करत त्याचा शोध घेतला असता ते मिळून आले आहेत. लोकेशन ट्रॅकिंग मधून त्यांनी हे मोबाईल हस्तगत केले आहेत. आपला मोबाईल परत मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर आहे. मोबाईल मध्ये आपल्या आठवणी आणि कामाचा भाग समाविष्ट असतो त्यामुळे अनेकांनी या कामगिरीचं कौतुक केल आहे.
नागरिकांना मिळाली दिवाळी गिफ्ट
दिवाळी आपण प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट देत असतो. मात्र आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल हेच आमच्या साठी मोठ गिफ्ट आहे. अशी भावना आता नागरिकांनी व्यक्त केली आहे. सजग पोलिसांच्या कामगिरीमुळे हे शक्य झाला आणि आम्हाला आमचे मोबाईल परत मिळाले.
महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
अंबरनाथमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध आर्थोपेडिक डॉक्टरच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला ही डोंबिवली येथील रहिवासी आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केले असल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या पतीची मृत्यू झाली असून त्यांच्या उपचारादरम्यान पीडितेची आणि डॉक्टरची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत डॉक्टरने तिला लग्नाचे आमिष दाखवत सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप आहे. या घटनेने अंबरनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.






