21-year-old missing girl from Pune Sangvi found at Lohagad Vadgaon Maval Crime News
वडगाव मावळ : राज्यामध्ये महिला खरंच सुरक्षित आहे का असा सवाल आता सर्वांना पडत आहे. महिला अत्याचार आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडत आहे. पुण्यामध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी स्वारगेट बसस्थानकामध्ये प्रवासी युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. असे असताना राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथील बेपत्ता तरुणीचा मावळ तालुक्यातील लोहगड येथे किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळला. यामुळे पुण्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील सांगवीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह मावळमध्ये आढळल्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. काल गुरुवारी (दि. 20) शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तरुणीचा मृतदेह घेरेवाडीकडील बाजूला असलेल्या झाडाझुडपातून बाहेर काढला. मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय 21, रा. सांगवी) असे मृतदेह आढळलेल्या तरुणीचे नाव आहे. अवघ्या 21 वर्षीय तरुणीबाबत ही घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मानसी मंगळवारपासून बेपत्ता होती. मंगळवारी सकाळी ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली. त्यानंतर ती एका टॅक्सी मधून लोहगड येथे एकटी आली. टॅक्सीतून उतरून लोहगडावर जाताना तिकीट काउंटर वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. मानसी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तिचा शोध घेतला. त्यावेळी ती लोहगड येथे आल्याची माहिती मिळाली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांनी तिकीट काउंटर वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये ती दिसून आली. त्यामुळे मानसीचे नातेवाईक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी गड परिसरात तिचा शोध सुरू केला. लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरेवाडी कडील बाजूला नवग्रह मंदिराच्या जवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळला. गडावरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील हिंजवडी येथे व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाला आग लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. आता या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. या वाहनाच्या चालकाने कर्मचाऱ्यांबरोबरील वाद आणि पगार वाढ न झाल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. चालकाने आपणच हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. बुधवारी (दि.19) सकाळी साडेआठ वाजता हिंजवडी येथिल विप्रो सर्कल फेज एकच्या परिसरात अचानक या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. तर, सहा कामागार गंभिररीत्या भाजले. तसेच चार कर्मचाऱ्यांनी गाडीतून उड्या घेत आपला जीव वाचविला. प्रथमदर्शनी वाहनात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच जुन्या खुन्नसमधून आणि कंपनी प्रशासनाच्या नाराजीतून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.