Photo Credit- Social Media जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक
मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तिला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, या महिलेकडून तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरेंवर केलेल्या आरोपांचे प्रकरण संपवण्यासाठी संबंधित महिलेने तब्बल ३ कोटींची खंडणी मागितले होते. त्यानंतर या महिलेला १ कोटींची खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी या महिलेची चौकशी सुरू केली आहे. संबंधित महिलेने जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांनीही या प्रकरणी गोरेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण आता आरोप करणाऱ्या महिलेनेच हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.
Nagpur Violence Update: नागपूर हिंसाचारानंतर मौलवींचे पत्र; अमित शहांकडे केली मोठी मागणी
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून आपल्याला त्रास होते. आपल्याला त्रास देण्यासाठी त्यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असा आरोप संबंधित महिलेने केला होता. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अटक टाळण्यासाठी गोरेंनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक कऱण्यात आली होती. त्यावेळी जयकुमार गोरे यांना दहा दिवसांची जेलमध्येही जावं लागल्याचे महिलेने सांगितले होते.
दहा दिवसांची जेलवारी भोगलेल्या जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा सादर केल्याची माहिती आहे. मात्र, आता पुन्हा आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे. 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार 2025 पासून व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केली जात आहे, ज्यामुळे तिचे नाव उघड झाले आहे. तसेच, आपल्यावर दबाव आणण्यासाठी गोरे यांनी आपल्या पीए अभिजित काळे मार्फत खोटी तक्रार दाखल करत 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोन्ही बाजूंचे दावे तपासले जात आहेत.
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेवर अत्याचार; जीवे मारण्याची धमकी देऊन निर्जनस्थळी नेलं