Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIMI म्हणजे नेमकं काय? दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून एका मुलीला ATSने पकडलं

फरार दहशतवाद्याचा शोध घेत असताना तपास यंत्रणांच्या हाती त्याच्या कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचा धागा लागला. त्यानंतर मुंब्र्यात झालेल्या कारवाईत २१ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली. बनावट पासपोर्ट आणि परदेश प्रवासाच्या संशयामुळे या कारवाईकडे आता विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 11, 2026 | 04:51 PM
दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून २१ वर्षीय मुलीला ATSने पकडलं

दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून २१ वर्षीय मुलीला ATSने पकडलं

Follow Us
Follow Us:
  • मुंब्र्यातील कारवाईने तपासाला मिळाला महत्त्वाचा धागा
  • बनावट कागदपत्रांमुळे तपास यंत्रणांचा संशय बळावला
  • फरार व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याचा शोध सुरू
ठाणे: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई करत फरार इंडियन मुजाहिदीनशी संबंधित दहशतवादी तारीक खान याची २१ वर्षीय मुलगी नमिरा तारीक खान हिला मुंब्र्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे तपास यंत्रणांच्या हालचालींना वेग आला असून, नमिराच्या परदेश प्रवासासह बनावट पासपोर्टच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बनावट पासपोर्टच्या आधारे परदेश प्रवासाचा संशय

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नमिराने कथितरीत्या खोटी माहिती देऊन पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे. कुर्ला आणि लखनऊ येथील पत्त्यांचा वापर करून मिळवलेल्या पासपोर्टच्या आधारे तिने सौदी अरेबियाला दोन वेळा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवासादरम्यान तिने फरार असलेल्या वडिलांची भेट घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. नमिराने सौदी अरेबियासोबत पाकिस्तानमध्येही प्रवास केला होता का, याचाही तपास केला जात आहे. तिच्या प्रवासाची कागदपत्रे, पासपोर्ट आणि इतर संबंधित माहिती तपासली जात आहे.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अन्नविषबाधेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंब्र्यात काही दिवस वास्तव्यास

तपास यंत्रणा तारीक खानची पत्नी शबनम उर्फ फिर्दोष तारीक खान हिचाही शोध घेत आहेत. शबनम फरार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान नमिरा आणि तिची आई काही दिवस मुंब्रा परिसरात वास्तव्यास असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर एटीएसने नमिरावर कारवाई करत तिला ताब्यात घेतले. तारीक खानविरुद्ध प्रतिबंधित संघटना सिमी, इंडियन मुजाहिदीन, बनावट नोटा, दहशतवादी कारवाया आणि देशविरोधी कृत्यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे.

कोण आहे तारीक खान?

तारीक खान याचे पूर्ण नाव मोहम्मद तारीक अंजुमन हसन असून तो मूळचा बिहारचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. व्यवसायाने तो सिव्हिल इंजिनिअर असल्याची माहिती आहे. १९९८ पासून तो प्रतिबंधित संघटना ‘सिमी’मध्ये सक्रिय असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. २००३ मध्ये रियाज भटकल आणि इक्बाल भटकल यांच्यासोबत इंडियन मुजाहिदीनच्या स्थापनेत त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. या संघटनेचा संस्थापक सदस्य आणि वैचारिक मार्गदर्शक म्हणूनही त्याचे नाव तपासात समोर आले होते. २००७च्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरात इंडियन मुजाहिदीनशी संबंधित काही तरुणांना आश्रय आणि मदत पुरवल्याच्या प्रकरणातही तारीक खानचे नाव समोर आले होते. दरम्यान, नमिराच्या अटकेनंतर तिच्या परदेश प्रवासाचा नेमका उद्देश, बनावट पासपोर्टचा वापर आणि फरार वडिलांशी तिचे संबंध याबाबत एटीएसकडून तपास सुरू आहे. तिच्या आईचा शोधही घेतला जात आहे.

सीमी म्हणजे काय?

स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया ही संघटना १९७७ मध्ये अलीगड येथे स्थापन झाली. सुरुवातीला मुस्लिम तरुणांमध्ये धार्मिक आणि सामाजिक जागृती निर्माण करण्यावर संघटनेचा भर होता. मात्र, पुढील काळात संघटनेवर कट्टरतावादी विचारसरणी आणि दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप झाले. यानंतर केंद्र सरकारने २००१ मध्ये सीमीवर बंदी घातली. तपास यंत्रणांच्या मते, सीमीशी संबंधित काही माजी सदस्य पुढे इंडियन मुजाहिदीनशी जोडले गेले. मात्र, सीमी आणि इंडियन मुजाहिदीन या स्वतंत्र संघटना आहेत.

Web Title: 21 year old woman detained by ats in mumbra used a fake passport to travel to saudi arabia to meet her terrorist father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • ats
  • crime news
  • Thane news

संबंधित बातम्या

Namira Khan Mumbra Case:  १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन
1

Namira Khan Mumbra Case: १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या
2

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न
3

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न

पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
4

पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.