Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घराची ग्रील तोडून दोन लुटारू आत शिरले; वृद्ध दाम्पत्याला धमकावत सोन्याचे दागिने अन् रोकड लंपास

अमरावती मार्गावरील माऊलीनगर परिसरात घरफोडी करून वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन अज्ञात लुटारूंनी घराच्या हॉलची ग्रील तोडून घरात प्रवेश केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 11, 2026 | 12:30 AM
घराची ग्रील तोडून दोन लुटारू आत शिरले; वृद्ध दाम्पत्याला धमकावत सोन्याचे दागिने अन् रोकड लंपास

घराची ग्रील तोडून दोन लुटारू आत शिरले; वृद्ध दाम्पत्याला धमकावत सोन्याचे दागिने अन् रोकड लंपास

Follow Us
Follow Us:
  • ग्रील तोडून दोन लुटारूंचा घरात प्रवेश
  • वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून दागिने लंपास
  • लुटारूंच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना
अमरावती : अमरावती मार्गावरील माऊलीनगर परिसरात घरफोडी करून वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन अज्ञात लुटारूंनी घराच्या हॉलची ग्रील तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याला धमकावत सुमारे ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश ऑर्ड (रा. शिरजगाव अर्डक, ता. चांदूरबाजार) यांनी काही वर्षांपूर्वी माऊलीनगर परिसरात घर बांधले आहे. त्यांचे सासरे नाना पुंडलिकराव कराळे (वय ६५) हे गेल्या दोन महिन्यांपासून मुलगी आणि जावयासोबत येथे राहत आहेत. घटनेच्या रात्री मंगेश ऑर्ड आणि त्यांची पत्नी जेवण आटोपून आपल्या गावी गेले होते. त्यामुळे घरात नाना कराळे आणि त्यांची पत्नी असे वृद्ध दाम्पत्यच होते. याच संधीचा फायदा घेत दोन लुटारूंनी घराच्या हॉलची ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लुटले. यामध्ये ३० ग्रॅम वजनाचे दोन मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पट्ट्या, २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज होता.

हे सुद्धा वाचा : शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

लुटारूंच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना

लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे ३ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार आधारसिंह सोनवणे आणि एपीआय प्रेम केदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लुटारूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गरुड यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमरावतीमध्ये लुटीची घटना कुठे घडली?

    Ans: अमरावती मार्गावरील माऊलीनगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: लुटारूंनी किती रुपयांचा ऐवज लुटला?

    Ans: दोन लुटारूंनी वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ५ हजार रुपये रोख लुटले.

  • Que: पोलिसांनी लुटारूंचा शोध घेण्यासाठी काय कारवाई केली?

    Ans: चांदूरबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन पथके रवाना केली. तसेच श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

Web Title: Thieves threatened an elderly couple and made off with gold jewellery and cash nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Gold Theft

संबंधित बातम्या

Urali Kanchan: असा मृत्यू नको रे देवा! पाठीमागून वेगाने गाडी आली अन्..; 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
1

Urali Kanchan: असा मृत्यू नको रे देवा! पाठीमागून वेगाने गाडी आली अन्..; 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

५०० रुपयांच्या वादातून राडा! पती- पत्नीला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
2

५०० रुपयांच्या वादातून राडा! पती- पत्नीला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?
3

नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?

साकोली पोलिसांची मोठी कारवाई, 6 लाखांचा गांजा जप्त; दोघांना घेतले ताब्यात
4

साकोली पोलिसांची मोठी कारवाई, 6 लाखांचा गांजा जप्त; दोघांना घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.