
कारच्या धडकेत तरुण ठार, बहीण गंभीर जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन आणि त्याची बहीण दुचाकीवरुन (एमएच १२ एलसी ५५२६) सोलापूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या व्हेरना कारने (एमएच १२ पीठी ९०८९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कार चालकाने हयगयीने कार चालवल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. उरुळी कांचन जवळच्या सर्व चौकात सातत्याने अपघात घडून मनुष्यहानी होत आहे. त्यामुळे या चौकांत स्वयंचलित सिग्नल बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कारच्या धडकेत नयनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या बहिणीच्या डोक्याला, पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे पुढील तपास करीत आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
Crime News: उरळी कांचनमध्ये दोन मोबाईल शॉपी फोडल्या; तब्बल 75 लाखांचा ऐवज केला लंपास
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी बसस्थानकात सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. कोलबांद्रे मार्गावरील एसटी बस बसस्थानकात प्रवेश करत असताना बसचे पुढील चाक एका ६० वर्षीय महिलेच्या दोन्ही पायांवरून गेले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फातिमा अमिद जोगीलकर (वय ६०, रा. खेड) दापोली एसटी बसस्थानक परिसरात उपस्थित होत्या. बस स्थानकात येत असताना तिचे पुढील चाक फातिमा जोगीलकर यांच्या दोन्ही पायांवरून गेले. त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.
Ans: उरुळी कांचन येथे चार चाकी गाडीने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
Ans: उरुळी कांचनच्या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.