
५०० रुपयांच्या वादातून राडा! पती- पत्नीला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
नीतेश बावनकर (वय ३५, रा. मजीतपूर) आणि शुभम पाटले (वय २४) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही घटनेच्या वेळी दारूच्या नशेत होते. शेतातील जमिनीच्या व्यवहारावरून ५०० रुपयांच्या कारणावरून त्यांचा एका महिलेच्या पतीसोबत वाद झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. या वादातून दोघांनी पतीला मुक्क्यांनी मारहाण केली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून परिसरातील लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असलेल्या आरोपींनी कोणाचेच ऐकले नाही. त्यानंतर आरोपींनी त्यांचा घरासमोरील रस्त्यापर्यंत पाठलाग करून पुन्हा वाद घातला व महिलेला शिवीगाळ केली. यावेळी महिलेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, शुभमने अंगणात पडलेल्या बांबूच्या काठीने तिच्यावर हल्ला केला. यात महिला जखमी झाली. तिच्या हाताला आणि पाठीला दुखापत झाली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आले आहे.
घटनेनंतर जखमी महिलेने दावणीवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून दावणीवाडा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजता किहे करीत आहेत. केवळ ५०० रुपयांसाठी पती-पत्नीला मारहाण झाल्याने करुटोला परिसरात संताप व्यक्त होत आहे. दारूच्या नशेत केलेल्या या कृत्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
Ans: 500 रुपयांच्या वादातून नितेश बावनकर आणि शुभम पाटले यांनी एका महिलेच्या पतीला मुक्क्यांनी मारहाण केली. सोडवायला गेलेल्या पत्नीवरही बांबूच्या काठीने हल्ला करून तिला जखमी केले.
Ans: शेतातील जमिनीच्या व्यवहारावरून 500 रुपयांवरून वाद झाला. दोन्ही आरोपी दारूच्या नशेत होते आणि त्यांनी घरासमोर येऊनही शिवीगाळ केली.
Ans: महिलेच्या तक्रारीवरून दावणीवाडा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास PSI अजता किहे करत आहेत.